Jalgaon Jamod : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून अद्यापपर्यंत सरकारी मदत मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते 'स्वाभिमानी'च्या विदर्भ विभागाचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.
संघटनेचे कार्यकर्ते त्यांचा शोध घेत आहेत. उपोषण कर्ताच गायब झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसापासून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रशांत डिक्कर हे उपोषणाला बसले होते.
दोन दिवसापूर्वी प्रशासनाने उपोषण मंडपाचा वीज पुरवठा खंडीत केला होता. त्या विरोधात काल (गुरूवारी) महाविकास आघाडीने जळगाव जामोद येथे रस्ता रोको केला होता.
काल (बुधवारी) रात्री अचानक डिक्कर हे उपोषण मंडपातून गायब झाल्याची माहिती आज सकाळी स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. डिक्कर कुणालाही न सांगता अचानक मंडपातून निघून गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.