NCP Supriya Sule on BJP politics : खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. "भाजप राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना 'डर्टी डझन'चा आरोप करत होता, त्याच्यात त्यांचं नाव होतं, असं मला वाटतं. म्हणजेच, भाजप त्यावेळी हसन मुश्रीफांवर आरोप करत होता, असं आता वाटतंय. पुढं त्यांनीच भाजपला मित्र केलं, आता वॉशिंग मशीन झालं की, नाही झालं, मला याच्यातलं काहीच माहिती नाही", असा टोला सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकताच कागल (जि. कोल्हापूर) इथं दौरा केला. कागलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजपचे समरजितसिंह घाटगे यांना पवार गटाने खेचून आणत हसन मुश्रीफांना आव्हान तयार केलं. या राजकीय खेळीमुळे हसन मुश्रीफ अस्वस्थ झाले आहेत. हसन मुश्रीफ यांनी अल्पसंख्याकांचा डाव खेळत शरद पवार यांच्याविरुद्ध प्रतिडाव टाकला. परंतु हा डाव आता उलटू लागला आहे. हसन मुश्रीफांवर टीका होऊ लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील टायमिंग साधत हसन मुश्रीफ यांना सुनावलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुश्रीफसाहेब आमच्या कुटुंबातले होते. पवारसाहेबांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्यांच्या घरावर जेव्हा ईडी छापा झाला, तेव्हा त्यांच्या पत्नी लढल्या. पवारसाहेब उभे होते. पण मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपला त्यांनी मित्र केलं". भाजप (BJP) त्यावेळी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना 'डर्टी डझन'चा आरोप करत होती. त्यात हसन मुश्रीफ होते, असं आता वाटत आहे. पुढं काय झालं मला माहीत नाही. वॉशिंग मशीन झालं की, नाही झालं, मला याच्यातलं काही माहिती नाही. पण हसन मुश्रीफ आणि भाजप एकाच सरकारमध्ये आहेत. आता ते भ्रष्ट आहेत का नाही, मला काहीही माहिती नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
यवतमाळ इथं उमरखेडमध्ये आर्णी-केळापूर मतदारसंघातील भाजप आमदार डाॅ. संदीप धुर्वे नृत्यागंणा गौतमी पाटील हिच्या पुढ्यात नाच-गाण्यात गुंग असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय, यावर सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. "मला महागाई, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोण आमदार नाचले, मला माहिती नाही.असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच, पण मी कलाकारांच्या विरोधात नाही", असेही सुप्रिया समुळे यांनी म्हटलं.
भाजप आमदार नीतेश राणे यांनी अहमदनगर येथे जातीय तेढ निर्माण होईल, असे भाषण केले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बंदुकीचा इशारा करून दाखवणं किंवा मशिदीत घुसून मारू, अशी भाषा करणं याचं उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे".
समय सबसे बलवान है, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर महायुती सरकारला सुनावले. "आधी आमच्या काळात एसटीसाठी आंदोलन केलं. तेव्हा विलिनीकरणाची भाषा होत होती. आता काय परिस्थिती आहे? माझ्या घरावर हल्ला झाला होता. म्हणजे सत्यमेव जयते हे खरं आहे", असे सुप्रिया सुळे म्हटल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.