Aaditya Thackeray : अरविंद सावंतांना वरळीतून कमी मताधिक्य, आदित्य ठाकरे म्हणतात...

Worli Assembly Constituency : आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून अरविंद सावंत यांना फक्त 6 हजार 700 मतांची आघाडी मिळाली आहे.
aaditya thackeray arvind sawant.png
aaditya thackeray arvind sawant.pngsarkarnama
Published on
Updated on

दक्षिण मुंबईतील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते, अरविंद सावंत यांचा 52 हजार 673 मतांनी विजय झाला. सावंत यांना निवडणुकीत 3 लाख 95 हजार 655 मते मिळाली, तर यामिनी जाधव यांना 3 लाख 42 हजार 982 मते मिळाली.

अरविंद सावंत यांच्या विजयाच्या आघाडीत मुंबादेवी आणि भायखळा येथील मतांचा मोठा वाटा आहे. पण, शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या वरळी बालेकिल्ल्यातून सावंत यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून अरविंद सावंत यांना फक्त 6 हजार 700 मतांची आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यात सचिन अहिर, सुनील शिंदे यांचा समावेश आहे. मुंबई माजी महापौर किशोरी पडणेकर यादेखील याच मतदारसंघातील आहेत. त्यामुळे ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांना कमी मताधिक्य मिळाल्याचं विश्लेषण तुम्ही केलं का? याबद्दल एका वृत्तवाहिनीनं आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही काम करतो, विश्लेषण करत नाही. विश्लेषणात न जाता पुढील टप्प्याकडे पाहणं गरजेचं आहे. एक मतानं जिंका, हजार मतानं जिंका किंवा लाख मतानं जिंका. पण, वाराणसीच्या मताधिक्याचं विश्लेषण झालं पाहिजे."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत दहा वर्षे बहुमताचं सरकार चालवलं. तरीही, वाराणसीत मतमोजणीत पंतप्रधान तीनवेळा मागे राहिले होते. आमच्या मतदरासंघाचं विश्लेषण आम्ही करूच. पण, जे भाजपचे चेहरे होते, 'चारसौ पार'कडे पाहत होते, ज्यांनी 10 वर्षात देशाला विश्वगुरू केलं, त्यांच्या मतदारसंघात ते मागे का होते? वाराणसीत नाराजी का आहे? अयोध्येत का पराभव झाला?" असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

वरळीसह आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढणार का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, "मला पक्ष आदेश देईल, तसं मी लढेन. माझी इच्छा कुठूनही लढण्याची आहे. पण, वरळी मतदारसंघ मी सोडू शकत नाही. तेथील विकासकामे अजून बाकी असून ते सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एका वेगळ्या वेगानं आम्ही काम करत होतो. पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे. बीडीडी चाळीतील घरांचं चावीवाटप डिसेंबर महिन्यात होईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com