Supriya Sule News : सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आवाहन

Supriya Sule News : सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे.
Supriya Sule News
Supriya Sule NewsSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. शुक्रवार (ता.३०) त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या, ''राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे.''

Supriya Sule News
Sharad Pawar on PM Modi: शरद पवारांनी मुद्यांसह मोदींच्या आरोपांची केली चिरफाड; म्हणाले...

''आपणां सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन.''

Supriya Sule News
Sharad Pawar News : फडणवीसांसोबत आमची चर्चा झाली; पण तो डाव होता की आणखी काही ते तुम्हीच ठरवा…पवारांची पुन्हा गुगली

''आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल.'' असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com