Sushma Andhare : '' सुषमा अंधारेंच्या सभेत कुणाकुणाचा व्हिडीओ वाजला...

Sushma Andhare : लवकर उठा अण्णा, तुम्ही आधुनिक काळातील गांधी आहात...
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ''लाव रे तो व्हिडीओ'' या वाक्यानं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात धुमाकुळ घातला होता. विरोधक मातब्बर नेत्यांनी देखील राज यांच्या व्हायरल व्हिडीओचा धसका घेतला होता. मनसेचा हाच पॅटर्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वापरत सध्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. कल्याण पूर्वेतील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे महाप्रबोधन यात्रा ही लाव रे तो व्हिडीओ या वाक्यानेच गाजली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, किरिट सोमय्या, अनंत तरे यांचे व्हिडीओ व्हायरल करत त्यांचेच डाव त्यांच्यावर अंधारे यांनी उलटवल्याचे त्यांच्या भाषणात दिसून आले. भाजपाने ज्यांना ज्यांना जवळ केले त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा टोला लगावत खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच हे कबुल केल्याचा व्हिडीओ त्यांनी सभेत दाखवला. माझे 40 भाऊ कॉपी करुन पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहे. माझ्या भावांकडे कपडे फाडण्याची खाती दिली आहेत असा खोचक टोला त्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना लगावला.

Sushma Andhare
Chandrakant Patil : भाजप नेत्यांना नेमकं काय झालंय? आता चंद्रकातदादा म्हणाले,फुले, आंबेडकरांनी....

बीकेसीली करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी सोमय्या गप्प का ?

अंधारे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका केली. संजय राठोड हे आता निर्दोष वाटत असतील तर पूजा राठोडची जाणीवपूर्वक बदनामी केली. तिची राजकीय शिडी केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. बिकेसीला मेळावा झाला, करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी किरीट सोमय्या गप्प का? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.

Sushma Andhare
Maharashtra-Karnataka : सीमाप्रश्न पेटला; सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

अण्णा तुम्ही कोठे गेलात, मी शोधतेय तुम्हाला...

आंदोलन करणारे अण्णा हजारे आता कोठे गेले आहेत ? लवकर उठा अण्णा, तुम्ही आधुनिक काळातील गांधी आहात असे तुम्हाला म्हटले जाते. तुम्ही आता कोठे गेले आहात. मी तुम्हाला शोधत आहे, मला मदत करा असा टोला त्यांनी हजारेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com