राज ठाकरेंच्या 'त्या व्हिडीओ'वरुन अंधारेनी डिवचलं; म्हणाल्या...

Sushma Andhare : राज्यातले प्रकल्प इतर राज्यात गेले याचं मला अजिबात दु:ख वाटत नाही, इतर राज्यांचाही विकास झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंच्या 'त्या व्हिडीओ'वरुन अंधारेनी  डिवचलं; म्हणाल्या...

Sushma Andhare news | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत झालेल्या सभेत राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टीका केली. त्यांच्या या टिकेचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खरपुस समाचार घेतला आहे. “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आज ते सगळीकडे फिरत आहेत. पण यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही”, असं विधान राज ठाकरेंनी केलं. यावर बोलताना “राजभाऊंचा तो स्वभाव नाही, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. पण शब्द सत्यातसुद्धा उतरले पाहिजेत. ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला? याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं, असा खोचक टोला लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातले प्रकल्प इतर राज्यात गेले याचं मला अजिबात दु:ख वाटच नाही, इतर राज्यांचाही विकास झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते. यावर बोलताना असं असेल तर तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा ‘संघराज्य सेना’ असं करा ना”, असा खोचक टोलाही अंधारे यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंच्या 'त्या व्हिडीओ'वरुन अंधारेनी  डिवचलं; म्हणाल्या...
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे शिवसेना नेत्याने सांगितले कारण...

राज ठाकरे ईडीच्या नोटीशीला घाबरले की, ते भाजपच्या विरोधात बोलू शकत नाही, या प्रश्नावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, ते भाजपच्या विरोधात बोलू शकत नाहीच, पण त्यांच्या अख्ख्या भाषणाचा घोषवारा काढला तर, बोलाची कढी आणि बोलाचाच भात म्हणजे काय हे कळेल. तसेच, मराठीच्या मुद्द्यावरुन तुम्ही महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहात आहे असं तुम्ही सांगता. पण नेमकं तुम्ही काय निर्माण करू पाहात आहात. असा सवालही अंधारे यांनी राज ठाकरेंना केला आहे.

छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांबद्दल आपण काहीच बोलू इच्छित नाही. त्यांच्या पायउतार होण्याबाबत तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मनसे म्हणजे ‘मतदार नसलेली सेना’ म्हणत अवहेलना केली, त्यांना तुम्ही ठामपणे उत्तरं देऊ शकत नाही. तुम्ही जोर दाखवता तो कुटुंबातच…भावकीत भांडणं करण्यातच तुम्ही शिरशिरी दाखवता. यावरुन कळतं पैसे कुणी घेतले किंवा ईडीच्या नोटिशीची भीती कुणाला वाटली”, अशी घणाघाती टीका अंधारेंनी केली. आम्हाला ईडीची भिती असती, तर आम्ही बिळात बसलो असतो. पण आजही आम्ही ठामपणे लढत आहोत, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com