Sushma Andhare : '' ...तर अद्वय हिरेंवरील सगळ्या कारवाया जागीच थांबतील'' ; सुषमा अंधारेंचं विधान!

Advaya Hire Arrested : भाजपावर साधला आहे ; निशाणा जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या आहेत?
Sushma Andhare Tweet News :
Sushma Andhare Tweet News :Sarkarnama
Published on
Updated on

ShivSena Thackeray group News : शिवसेना (ठाकरे गट) उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रेणूका सुत गिरणी संस्थेसाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात ते पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आता त्यांना अटक झाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare Tweet News :
Rohit Pawar On BJP : भाजपला ६० वर्षांपासून शरद पवारांची भीती अन् ती...; रोहित पवारांचा टोला

तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. "अद्वय हिरे यांनी अगदी आज या क्षणाला जरी म्हटलं की मी शिवसेना सोडून भाजपसोबत यायला तयार आहे, तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाई जागच्या जागी थांबून जातील.'' असं त्या म्हणाल्या आहेत.

याशिवाय '' 70 हजार कोटींचा घोटाळा 72 तासांच्या आत नजरेआड होऊ शकतो. व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफांच्या घरी आणि ऑफिसमध्ये प्रचंड फेऱ्या मारत होते. प्रसाद लाड यांनाही क्लिन चीट मिळू शकते. पण त्यांनाही क्लिन चीट मिळू शकते. मोहित कंबोजच्या शेकडो कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी क्लिन चीट देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. साडेसात कोटीच्या अनियमिततेपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा अपराध काय आहे तर ते भाजपच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com