Rohit Pawar On BJP : भाजपला ६० वर्षांपासून शरद पवारांची भीती अन् ती...; रोहित पवारांचा टोला

Chandrakant Patil : नाते वेगळे आणि राजकारण वेगळे
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पवार कुटुंबीय एकत्र दिवाळी साजरी करणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय समजत नाही, असे मत भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यावर आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका करताना भाजपचा समाचार घेतला. (Latest Political News)

अजितदादा पाडव्याच्या गोविंदबागेतील गाठीभेटी कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी त्यांनी सायंकाळी एकत्रित स्नेह भोजनाला उपस्थिती लावली. एव्हढेच नव्हे तर या स्नेह भोजनानंतर झालेल्या फोटोसेशन कार्यक्रमात दादा हे अगदी साहेबांच्या पाठीमागे हसत चेहऱ्याने उभे असलेले दिसले.

चंद्रकांत पाटील म्हणाले...

शरद पवारांनी आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे दिवाळी साजरी केल्यावर चंद्रकांत पाटलांनी सूचक वक्तव्य केले होते. ते म्हणाले, 'शरद पवार कुटुंब दिवाळीनिमित्त एकत्र येताना कळते. मात्र, शरद पवार आणि अजित पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही.' त्यावर आमदार रोहित पवारांनी पाटलांवर जोरदार निशाणा साधला.

Rohit Pawar
Rohit Pawar Vs Nilesh Lanke: नीलेश लंकेंच्या अंगणात रोहित पवारांनी फोडला बॉम्ब; भाऊबीजेतून विजय औटींचं लाँचिंग!

काय म्हणाले रोहित पवार ?

'गेल्या साठ वर्षांमध्ये भाजपने शरद पवारांच्या डोक्यामध्ये काय चाललेय याची भीती नेहमीच बाळगली आहे. ती भीती कधी जाणार. आता 2024 ला हीच भीती त्यांच्या मनात आहे. लोक काय निर्णय घेणार हे साहेबांना माहिती आणि साहेब लोकांकडे बघून काय निर्णय घेणार, ते कशा पद्धतीने राजकारण करणार हे भाजपला कळणार नाही. ते निर्णय लोकांच्या हिताचे असतील,' असा टोला रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या प्रतिक्रियेवर लगावला आहे.

नाते आणि राजकारण वेगवेगळे

राजकीय दृष्टिकोनातून कुटुंबीयांची काय चूक आहे. घरचे नाते वेगळे आणि राजकारण वेगळे. त्यामुळे पवार कुटुंबाने एकत्रित दिवाळी साजरी केली, असेही रोहित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, 'अजित पवार यांनी राजकीय भूमिका वेगळी घेतली असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. पवार कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांची भूमिका ही एकत्र येऊन दिवाळी साजरी करण्याची असते. त्यामुळे ही दिवाळी साजरी केली,' असेही पवार म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Rohit Pawar
Pune Crime News : पुण्यात 'कोयता गँग'ची हिंमत आणखी वाढली; आता खडकी, चंदननगर भागात तरुणांवर हल्ला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com