Mumbai Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट रचल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांच्या या आरोपाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोनच शब्दांत विषय मिटवला आहे. या बालिश वक्तव्यावर न बोललेलेच बरे, असा टोला अंधारेंनी लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या या दोन दिवसांच्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आल्या आहेत. कल्याणचे शहर प्रमुख शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेत सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांच्यासोबत अंधारे यांच्या बैठकीचे आयोजन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी नेत्या अंधारे यांनी संवाद साधला.
भाजपचे नेते कंबोज Mohit Kamboj यांनी केलेल्या आरोपांवर अंधारे म्हणाल्या, मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार काही बोलावसे वाटत नाही. दोन टप्प्यांमध्ये मतदानाचे एकूण निरीक्षण आणि विश्लेषण येत आहेत. त्यावरून भाजपच्या हे पक्क लक्षात आले आहे, की महाराष्ट्रातील निवडणूक त्यांच्या हातामधून पूर्णतः निसटली आहे. भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेड मधील कंबोज, राणे वगैरे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत आहेत.
ज्या पद्धतीने मोदी Narendra Modi म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत. किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामे आहेत वगैरे वगैरे. जर असे असते तर मग उद्धव यांच्या आजारपणाच्या काळामध्ये, मोदीजींनी त्यांची सत्ता पटलावरून खाली खेचण्यासाठी एवढे मोठ षडयंत्र रचले असते का? त्यामुळे आता फक्त आणि फक्त उद्धव यांचे गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी काही व्यक्तव्ये केली जात आहेत. आता त्याला काही अर्थ नाही. आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यावर न बोललेले बरे, असे अंधारेंनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपले स्थान टिकवावे
महाविकास आघाडीने 18 जागा जिंकल्या तर राजकीय संन्यास घेईल असे ओपन चॅलेंज आशिष शेलार यांनी केलं आहे. यावर सुषमा अंधारे Sushama Andhare म्हणाल्या, मला बाकीच्यांच्या चॅलेंजशी काही घेणं देणं नाही. फक्त शेलार यांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती. ती जागा त्यांना आता परत मिळावी. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्कटदाबी करू नये. एवढीच माझी अपेक्षा आहे. इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा सध्या शेलारांनी आपले स्थान टिकवण्यावर लक्ष द्यावे, बाकी आमचे काय ते आम्ही बघून घेऊ, असा टोलाही त्यांनी लगावला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.