Sushma Andhare : एक मोठा धडाम आवाज अन् त्यानंतर स्मशान शांतता; हॅलिकॉप्टर क्रॅशचा अंधारेंनी सांगितला थरार

Helicopter Crash : राजकारणापलिकडे जाऊन मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रवीण दरेकर आदी मंडळींनी त्यांची चौकशी केली. मानवी पातळीवर झालेल्या या काळजीतून राजकीय सुसंस्कृतपणाही दिसून
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी (ता. 2) पोलदापूर आणि महाडची सभा गाजवल्या. त्यानंतर त्या तेथेच मुक्कामी होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 3) त्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर येणार होते. त्यासाठी त्या सकाळीच तयार झाल्या. मात्र लँडिग करतेवेळीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघाताचा थरार तेथे उपस्थित असलेल्या खुद्द अंधारेंनी फेसबुकवर पोस्ट करून सांगितला आहे.

महाडच्या सभेनंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे Anil Navgune यांच्यावर विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला. यात त्यांचे साथीदार जखमी झाले. या प्रकरणानंतर रात्री उशिरा झोपलेल्या सुषमा अंधारे सकाळी तयारी करून हेलिपॅडकडे गेल्या. तेथे नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे हेलिकॉप्टर उशिरा आले होते. त्यावेळी तेथे जे काही घडले याबाबत अंधारेंनी सविस्तर वर्णन केले आहे.

अंधारे Sushma Andhare म्हणाल्या, 20 मिनिटे उशिरा हेलिकॉप्टरची मोमेंट जाणवली होती. त्यावेळी तेथे उपस्थित एका सहकाऱ्याने त्या दृश्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. पण अवघ्या काही क्षणात हेलिकॉप्टरऐवजी फक्त धुळीचे लोट आजूबाजूला दिसत पसरले. त्यात माझ्या मुलीची प्रतिमा धूसर दिसत होती. या धुळीच्या वातावरणात काही कळण्यापूर्वीच एक मोठा धडाम आवाज अन् त्यानंतर पाच मिनिटे त्या संपूर्ण वातावरणात स्मशान शांतता पसरली होती. फार जवळून मृत्यूचा साक्षात्कार अनुभवला, असा थरारच त्यांनी सांगितला.

Sushma Andhare
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : भाजप नेत्यानं ठरवलं; 'आता त्यांची 'कोल्हे कुई' थांबवायचीय!'

हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्याचा पायलट सुरक्षित आहे का ? याची चौकशी केली. या घटनेत त्या बिचाराचा काहीच दोष नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तमाम महाराष्ट्राचे.. मायबाप जनतेचे, अनगिणत भावंडांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा पोहोचत आहेत, असे म्हणत अंधारेंनी सर्वांचे आभारही मानले. अपघाताची माहिती कळल्यानंतर दहा मिनिटांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray, रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली. संजय राऊत, वैभव नाईक, अनिल देसाई, किशोरी पेडणेकर, अमृता फडणवीस यांनी फोन करून चौकशी केल्याचेही अंधारेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक विरोधकांवर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. मात्र राजकारणापलिकडे जाऊन मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal, धनंजय मुंडे, प्रवीण दरेकर आदी मंडळींनी त्यांची चौकशी केली. मानवी पातळीवर झालेल्या या काळजीतून राजकीय सुसंस्कृतपणाही दिसून आल्याचे ते म्हणाल्या. याचे वर्णन करताना अंधारेंनी 'न जाने मेरे हक में दुवा करता है, जितनी बार डूबती हूं, कोई तिनका बनकर समंदर से बाहर ऊछालता है।' असे करत 'बचेंगे लढेंगे जितेंगे..' असा विश्वासही व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Sushma Andhare
Sharad Pawar Vs Narendra Modi : नरेंद्र मोदींचा सत्य बोलण्याशी काही संबंध नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com