Amol Kolhe Vs Adhalrao Patil : भाजप नेत्यानं ठरवलं; 'आता त्यांची 'कोल्हे कुई' थांबवायचीय!'

Lok Sabha Political News : बारामती लोकसभेनंतर लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघातील उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्य पातळीवरील नेत्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
BJP
BJPSarkarnama

Pune Political News : शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर कोल्हे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभा मेळावे घेतलेले आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवार यांनी देखील जोर लावला आहे. त्यामुळे शिरूरचे वातावरण चांगलेच तापले आहे.

या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली. दरेकर म्हणाले, ज्यांना आपण केलेली साधी पाच कामेही सांगता येत नाहीत, त्यांची 'कोल्हे कुई' आपल्याला आता थांबवायची आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

बारामती लोकसभेनंतर लक्ष लागून राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघातील उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्य पातळीवरील नेत्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolheनिवडणूक लढवीत आहेत. महायुतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिरूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून या मतदारसंघातून उमेदवारी घेतली आहे.

BJP
Sharad Pawar Vs Narendra Modi : नरेंद्र मोदींचा सत्य बोलण्याशी काही संबंध नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

शिरूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या डायलॉगबाजीने प्रचारात रंगत आली आहे. ते एकमेकांची जुनी उणीदुणी काढायचा प्रयत्न करतात. दरेकर Pravin Darekar म्हणाले, ते फक्त 'कोल्हे कुई' करू शकतात. आज केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे Eknath Shinde हे भरभरून निधी देणारे नेतृत्व आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाचे सरकार असेल तर विरोधी विचारांच्या नेत्याला खासदार म्हणून निवडून देण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे यांचा हा शेवटचा प्रयोग आहे. नाटकात जसा शेवटचा अंक असतो तसे पुन्हा त्यांचे नाटक आपल्याकडे आता चालणार नाही. त्यांनी पाच वर्षे राजकीय नाटक केले आहे. त्यातून आपला विकास थांबवला. यामुळे त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात परत पाठवण्याची वेळ आली असल्याची टीकाही दरेकरांनी यावेळी केली.

(Edited by Sunil Dhumal)

BJP
Rahul Gandhi Pune : मोदी सरकार फक्त 5 टक्के लोकांची काळजी घेते; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com