Sushma Andhare : महिला आयोगाचे नोटीस म्हणजे प्रेमपत्र : अंधारेंचा खोचक वार!

Sushma Andhare : एखाद्याला प्रेम पत्र दिल्याारखं नोटीशी नका काढू हो, नोटीशी काढल्यानंतर, तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत.
Rupali Chakankar-Sushma Andhare
Rupali Chakankar-Sushma AndhareSarkarnama

मुंबई - राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेच टीपण्णी केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने तात्काळ याची दखल घेतले नसल्याचे सांगत, आयोगाच्या कामकाजावर बोट ठेवले होते. मी दोन वेळा आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोन केला होता. पण त्यांनी तो उचलला नाही, असे अंधारे म्हणाल्या यावरून आता सुषमा अंधारेंविरोधात महिला आयोगाचा अवमान केल्याची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

गुलाबराव पाटील यांच्यावर आयोगावर कारवाईसाठी दोनवेळा अध्यक्षा चाकणकर यांना फोन केला. पण फोन घेतला गेला नाही. सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना पाटील यांनी 'नटी' शब्दाचा वापर केला. यावर दोन्ही बाजूंनी टीका प्रतिटीका सुरू होती. महिलाविरोधी असे वक्तव्य होऊनही, योग्य ती कारवाई झाल्याने आयोगाच्या कार्यपद्धतीवर अंधारे यांनी सवाल उपस्थित केले होते. यावरून आता अंधारेंविरोधात महिला आयोगाचा अवमान केल्याची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

Rupali Chakankar-Sushma Andhare
जामीन मंजूर होताच राऊत आधी गोंधळले, मग भावूक झाले अन् पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले...

अंधारे म्हणाल्या, मी महिला आयोगावर टीका करण्याचा विषय नाही पण, आयोगाचे याबाबत लक्ष आणू इच्छीते की, जर गुलाब पाटलांविरोधात ४ दिवसांपूर्वीच जर कारवाई म्हणून नोटीस दिली असती, किंवा संभाजी भिडेंनाही याआधीच नोटीस दिली असती, तर अशी प्रकरणं घडली नाही. एखाद्याला प्रेम पत्र दिल्याारखं नोटीशी नका काढू हो, नोटीशी काढल्यानंतर, तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत. कडक कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर टीकी केली.

यावरून आता अंधारेंविरोधात महिला आयोगाचा अवमान केल्याची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत आता त्यांना नोटीस बजावणार असल्याचे समजत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com