
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कधीही विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून वाटाघाटी सुरु आहे. त्यातच अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमदही महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडून फहाद अहमद यांच्यासाठी अणुशक्ती नगर विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. आता महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला एन्ट्री मिळणार का, महाविकास आघाडी समाजवादी पक्षाला जागा देणार का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
फहद अहमद यांच्यावर सध्या समाजवादी पक्षाची युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी या जागेवरून उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अणुशक्ती नगरमधून या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक विजयी झाले होते. सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटात सक्रिय आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.
फहाद अहमद (Fahad Ahmed) हा विद्यार्थी नेता म्हणून 2022 मध्ये समाजवादी पक्षात सामील झाले. सध्या ते समाजवादी पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष आहेत. जर एमव्हीएने ही जागा सपाला दिली तर फहादचा सामना नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांच्याशी होऊ शकतो.
आगामी विधानसभा निवडणुकीत अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक Navab Malik यांच्या विरोधात महाविकास आघाडी (एमव्हीए) तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. युतीने मित्रपक्षांसाठी चार जागा सोडल्या आहेत. समाजवादी पक्षाने स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांच्यासाठी ही जागा मागितली आहे. अबू आझमी यांच्यासोबतच्या संघर्षात समाजवादी पक्ष फहाद अहमद यांच्या रूपाने युवा नेतृत्वाला उभे करू इच्छित असल्याचे मानले जात आहे.
1995 पासून त्या अबू आझमी (Abu Azmi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अबू आझमी यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते. यानंतर आझमी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, मात्र त्यांनी सपा सोडण्यास नकार दिला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी राहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.