Supreme Court : हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी मागितली माफी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतलं फैलावर, काय आहे प्रकरण?

Karnataka High Court Dhananjay Chandrachud Justice Srishanand : न्यायाधीश श्रीशानंद यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी मुस्लिमबहुल भागाला पाकिस्तान संबोधले होते.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायाधीश श्रीसानंद यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. या विधानावरून सुप्रीम कोर्टाने न्यायाधीशांना चांगलेच फैलावर घेतले होते. माफीनाम्यानंतर कोर्टाने संबंधित केस बंद केली आहे.

न्यायाधीश श्रीशानंद यांनी एका केसच्या सुनावणीवेळी मुस्लिमबहुल भागाचा पाकिस्तान असा उल्लेख केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. न्यायाधीशांचे व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Supreme Court
Amit Shah Vs Sharad Pawar : भाजपच्या 'चाणक्या'च्या संकल्पाला 'वस्तादा'च्या डावपेचांचा 'स्पीडब्रेकर!'

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले की, हायकोर्टाचे न्यायाधीश श्रीशानंद यांनी स्वत: कोर्टात वकिलांना बोलवून माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही, असे आम्हाला वाटते.

न्यायाधीश श्रीशानंद यांनी बेंगलुरू येथील एक मुस्लिम बहुल भागाला मिनी पाकिस्तान म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी खुलासा करताना आपला कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. न्यायाधीशांनी कोर्टात सर्वांसमोर वकील आणि सर्व नागरिकांची माफीही मागितली होती.

Supreme Court
Kangana Ranaut : वादग्रस्त विधानानंतर खासदार कंगनाची माघार; पक्षाने पुन्हा झापल्यानंतर मागितली माफी

सुप्रीम कोर्टाने घेतले फैलावर

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीशांना तंबी दिली. ते म्हणाले, भारतातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणणे हे देशाच्या अखंडतेविरोधात आहे. कुणीही भारताच्या कुठल्याही भागाला पाकिस्तान संबोधू शकत नाही. न्यायाधीशांनी आपल्या विधानांबाबत संयम राखावा. लाइव्हि स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियाच्या काळात अतिरिक्त सावधानता बाळगायला हवी. एखाद्या केसच्या बाहेर जाऊन एखाद्या वर्गाविषयी भेदभावाची भावना निर्माण होईल, अशी टिपण्णी करणे टाळावे.  

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी न्यायाधीश श्रीशानंद यांचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत सरन्यायाधीशांनी याची दखल घेण्याची मागणी केली होती. तसेच सोशल मीडियातही त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 20 सप्टेंबरला कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून याबाबत अहवाल मागितला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com