Ambadas Danve : 'टेस्ट' खेळतो तसा 'ट्वेन्टी 20' खेळेन; निलंबन मागे घेतल्यानंतरही अंबादास दानवेंची नाराजी

Vidhan Parishad Adhiveshan : उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी दानवेंच्या माफीनाम्यानंतर निलंबनाचा कालावधी पाचवरून तीन दिवसांवर आणला आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात कामकाज सुरू असताना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यावर उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई केली होती.

यावर दानवेंनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाचवरून तीन दिवसांवर आणला आहे. तरीसुद्धा दानवेंची नाराजी काही कमी झालेली दिसत नाही.

निलंबनाच्या कारवाईचा कालावधी कमी केल्यानंतर दानवेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली नाराजी जाहीर केली. मात्र मिळालेल्या कालावधीत जोरदार काम करणार असल्याचा दावाही केला. दानवे Ambadas Danve यांनी, निलंबन मागे घेतल्याबाबत सभापतींचे आभार मानतो. मात्र त्यांनी फार काही न्याय दिला असा काही भाग नाही, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

सभागृहातील कामकाजाचे तीन दिवस तर संपलेले आहे. उद्याचा एक दिवस आहे. परवा काही कामकाज नाहीच. त्यामुळे कामकाजाच्या पाच दिवसांपैकी मला फक्त एक दिवस मिळणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. मात्र काही हरकत नाही. जसा टेस्ट मॅच खेळतो तसा या एका दिवसात टेन्टी 20 मॅचही खेळू शकतो, असे म्हणत दानवेंनी एकप्रकारे सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार करण्याचे संकेत दिले आहे.

Ambadas Danve
Phulambri Assembly Constituency : कल्याण काळे खासदार झाल्याने फुलंब्रीत ‘भावी आमदारां’चे पीक वाढले उदंड!

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचे निलंबन करण्याची पहिलीच घटना आहे. या निलंबनामुळे सभागृहात विरोधी पक्षनेत्याची उणिव जाणवत असेल, असेही दानवे यांनी म्हटले. विरोधी पक्षनेत्याला संवैधानिक अधिकार असतात. त्याला सर्व विषयांवर आपली भूमिका मांडण्याचे अधिकार असतात. तसे अधिकार इतर सदस्यांना नसतात. याचा परिणाम सभागृहात कमतरता जाणवते.

Ambadas Danve
Dattatray Bharne: 'आमचं ठरत नसतं फिक्स असतं', दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील लढत अटळ?

उपसभापति गोऱ्हे Nilam Gorhe यांना पत्र पाठवले असले तरी मी दिलगिरी व्यक्त केलेली नाही, असा दावाही दानवे यांनी केला. ते म्हणाले, मी दिलगिरी व्यक्त करण्यासाबाबत माझ्या मानत कोणत्याही प्रकारचा किंतु-परंतु माझ्या मनात नाही, असे म्हणत दानवेंनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com