Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray News : हिम्मत असेल तर आज निवडणुका घ्या, आम्ही तयार...; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

BJP and Shivsena : ''२५ वर्ष भाजपबरोबर मैत्री केली पण आम्हाला काय मिळालं?''
Published on

Shivsena News : आज ठाकरे गटाचा मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. यावेळी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलं.''विधानसभा, लोकसभा, महापालिका यापैकी कोणत्याही निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत'', असं आव्हान देत त्यांनी आजच्या पंतप्रधानांना त्यावेळी बाळासाहेबांनी वाचवलं, अशी आठवणही करून दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''आता भारतीयांना उत्तर हवं आहे की हिंदुत्व म्हणजे काय? आज मेळावा घ्यायचा झाला तर मैदान कमी पडेल. त्यामुळे ही बैठकच आहे. नंतर मेळावाही आपण घेणार आहोत. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आज जे पंतप्रधान आहेत त्यांना ऐकेकाळी बाळासाहेबांनीच वाचवलं होतं. आम्ही २५ वर्ष भाजपबरोबर राजकीय मैत्री केली पण आम्हाला काय मिळालं?'', असा सवालही यावेळी त्यांनी केला.

Uddhav Thackeray
Ramesh Bais News Update : महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांना करावा लागणार या आव्हानांचा सामना...

''जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती होती. तेव्हा राजकारणात आम्हाला वाळीत टाकल्यासारखं केलं होतं. त्यावेळी कोणीही आम्हाला साथ देण्यास तयार नव्हतं. आमच्या शेजारी येऊन बसण्याची देखील कोणी हिम्मत केली नाही. बाळासाहेबांनी कधीही मुस्लिमांचा द्वेष करा असं सांगितलं नाही. मी कधी हिंदू मुस्लिम असा द्वेष केला नाही. तसेच मराठी आणि अमराठी असाही द्वेष केला नाही'', असं ते यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray
Chinchwad By Election : राज्यपालांसारखंच चिंचवडची जनता भाजपलाही घालवणार; जयंत पाटलांनी डिवचलं

राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, ''महाराजांचा अपमान करणारं अमेझॉनचे पार्सल आता परत चाललं आहे. सध्या जनतेला मन की बात नको दिल की बात हवी आहे. आज मी उत्तर भारतीयांशी नातं मजबूत करायला आलो आहे. मी तुम्हाला जागरूक करायला आलो आहे. तसेच बोहरा समाजाचे लोक आमच्यासोबतही आहेत'', असं त्यांनी यावेळी सांगितलं.

Uddhav Thackeray
Buldhana News : मोठी बातमी : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

''भाजपनेच आम्हाला काँग्रेससोबत जाण्यास मजबूर केलं. राम मंदीरासाठी आम्ही देखील प्रयत्न केले आहेत. ते म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं पण आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व म्हणजे काय? भारतीयांना देखील या प्रश्नाचे उत्तर हवं आहे. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिदुत्व आहे. कोणावरही आम्ही अन्याय केला नाही आणि करणारही नाही. आमच्या ह्रदयात राम आणि हातात काम हे आमचं हिदुत्व आहे'', असं यावेळी ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com