Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुपकर यांची १४ चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. तुपकरांसह त्यांच्या २५ सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुपकर हे तीन दिवस भूमिगत होते. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आक्रमक झाले होते. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतप पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर तुपकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतले. त्यांच्या दिडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर परिस्थिती काहीशी निवाळलेली होती. मात्र आता पुन्हा तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ते चार दिवसापासून गायब होते.गेल्या मंगळवारी त्यांनी शेतकरी प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केला.
आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयानी कोठडी सुन्यावण्यात आली आहे. तुपकर यांच्यासह त्यांच्या पंचवीस कार्यकर्त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.