Graduate Constituency Election News: सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीनंतर कॉंग्रेसचा मोठा निर्णय

नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
Nana patole
Nana patoleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nana Patole : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. पण कॉंग्रेसकडून तांबे यांना कोणताही पाठिंबा मिळणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे.

सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसला धोका दिला. कॉंग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांनी ऐनवेळी अर्ज भरला नाही. नाशिक पदवीधरमधले मतदार अडाणी नाहीत. त्यांनी काय कृत्य केलंय हे त्यांनाही कळत आहे. पण भाजपने भिती दाखवून घरं तोडण्याची जी खेळी सुरु केली आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनेक वक्तव्ये ऐकत आहोत. दुसऱ्याची घरे फोडून ते कसा आनंद साजरा करत आहेत तेही आम्ही पाहतोय. पण ज्या दिवशी भाजपचंं घर फुटेल त्या दिवशी घर फुटल्याचं दु:ख काय असतं ते त्यांना कळेळ, अशी प्रतिक्रिया नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

Nana patole
MPSC Students Protest in Pune : परीक्षा पद्धतीतील नव्या बदलांबाबत विद्यार्थी आक्रमक; सरकार दखल घेणार का?

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवाराबाबत अर्ज भरण्यापर्यंत गुपीत कायम राहिले होते. कॉंग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची ऑफर असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार असतील काय? याबाबत चर्चा सुरू होती.

त्यातच कॉंग्रेसतर्फे सुधीर तांबे यांची अधिकृत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी जाहिर केली. त्यामुळे ते कॉंगेसचे उमेदवार असतील असे जाहिर झाले. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुधीर तांबे व सत्यजीत तांबे सोबत गेले. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. सत्यजीत तांबे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यात एक कॉंग्रेसतर्फे तर एक अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावाचा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचे सागंण्यात सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Solapur Dcc Bank Election-Leader
Uday Samant
Pune Graduate Teachers MLC Election 2026
Maharashtra Live Politics Update