Tata Airbus : गुजरात निवडणुका जिंकण्यासाठीच प्रकल्प पळवले : रोहित पवारांचा आरोप!

Tata Airbus : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, या सर्वाचं खापर त्यांच्यावर फुटू शकतं.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातून एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्यावर आता सरकारवर विविध स्तरातून टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना सडकून टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पावार यांनी भाजपवर जोरदार हल्लेबोल केला आहे. गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेले आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar
आम्ही एक चांगला माणूस गमावला; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

तीन महिन्यातच गेलेले प्रोजेक्ट याचे समीकरण बघा ना. महाराष्ट्राचं अस्मितेचं काय, युवकांचं काय? याबद्द्ल कोणीच बोलायला तयार नाही. मात्र या सरकारमधले सगळे हवेमध्ये बोलतायेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, या सर्वाचं खापर त्यांच्यावर फुटू शकतं. गुजरातमध्ये, केंद्रामध्ये सत्तेत कोण आहे? महाराष्ट्रात अप्रत्यक्षपणे सत्तेत कोण आहे? त्यामुळे याचे खापर शिंदे यांच्यावर आणि भाजपवरही फुटणार आहे, असे रोहित पवार म्हणाले.

महाराष्ट्र कुठे कमी पडतोय असं नाही, गुजरात जास्त पुढे पळतोय. हे प्रकल्प महाराष्ट्रात आले असते तर इथल्या तरूणांना रोजगार उपलब्ध झाले असते. आपल्या इथे छोटे- मोठे उद्योग उभे राहिले असते, गुजरात निवडणूक जिंकावी या हेतूने भाजपकडून प्रकल्प गुजरातला प्रकल्प पळवले जातात, असेही पवार म्हणाले.

Rohit Pawar
Tata Airbus Project : हे तर मिंधे सरकारचं पाप! देसाईंनी तोफ डागली...

दरम्यान टाटा एअरबस हा टाटा समूहाचा प्रकल्प गुजरातला गेले आहे. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, तसेच छगन भुजबळ यांनीही सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरले.

भुजबळ म्हणाले, मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जातायेत. टाटा समूह यांनी महाराष्ट्राला कायम प्रधान्य दिले आहे. कल्पना नाही काय झालं अचानक, आपले प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले. आता महाराष्ट्रातील तरूणांनी काय करायचं? आरत्या करा, हनुमान चालीसा म्हणा, फटाके उडवा, दहीहंडी करत बसू आपण, असा खोचक वार त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com