MNS News : गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित ; राज ठाकरे कोणत्या मुद्यांवर संबोधित करणार : 'मी हिंदू म्हणून अंगावर जाईन.."

Raj Thackeray teaser launch of maharashtra navnirman sena gudhipadwa melava : राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray teaser launch of maharashtra navnirman sena gudhipadwa melava : मनसेचा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी फारसं न बोलता, गुढीपाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुलाखत झाली. राज्यातील सत्तासंघर्षावर त्यांना विचारण्यात येणाऱ्या विविध प्रश्नांना टाळत राज ठाकरेंनी सूचकपणे इशारा दिला.

या प्रश्नांना बगल देत राज ठाकरे यांनी याबाबत आपण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असल्याचे सांगितले. "सध्याच्या राजकीय विषयावर बोलून मी तुम्हाला कुठलाही प्रोमो, टीझर देणार नाही, गुढीपाडव्याला सिनेमा दाखवणार," असे सांगत राज ठाकरेंनी विरोधकांना इशाराच दिला आहे.

भोंग्याचा विषय गेल्यावर्षी पाडवा मेळाव्यातून गाजला होता. त्यामुळे यंदा कोणत्या मुद्द्यावरून ते राज्याच्या जनतेला संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मेळाव्याचा टीजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समाज माध्यमावर शेअर केला आहे.

आगामी निवडणुका, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, पोटनिवडणुका, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील निकाल या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Raj Thackeray
Third Front without Congress: आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी ; ममता बँनर्जी, अखिलेश यादव..

शिवाजी पार्क येथे २२ मार्चला राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? कुठल्या मुद्यांवर भाष्य करणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना सुरवात झाली आहे.

“हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील,” अशा लिखित वाक्यांनी या टीझरची सुरुवात झाली आहे. यानंतर राज ठाकरेंचं भाषण ऐकू येतो.

Raj Thackeray
BJP News : चित्रा वाघांच्या अडचणी वाढल्या ; न्यायालयाचा दणका, राष्ट्रवादीच्या नेत्याने..

"माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन", असं राज ठाकरे म्हणत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व' असं लिहिण्यात आलं आहे.

२२ मार्च रोजी सकाळी राज्यभरातील विविध शहरातून शोभायात्रा निघेल. तर, सायंकाळी ६ वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून ते जाहीर सभा घेणार आहेत.

'महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावर सविस्तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहे,'असे राज ठाकरे पनवेल येथे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com