के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्यात चाय पे चर्चा; भाजपला घेरणार?

सध्या 'केसीआर' (KCR) तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 Uddhav Thackeray, K. Chandrasekhar Rao
Uddhav Thackeray, K. Chandrasekhar Raosarkarnama

मुंबई : तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी आज (ता.२०) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेजस ठाकरेही उपस्थिती होते. सध्या 'केसीआर' तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

 Uddhav Thackeray, K. Chandrasekhar Rao
मोदीजी मुलं अडकलीत, त्यांना मायदेशी आणा; जयंत पाटलांचे मोदींना आवाहन

केंद्रातल्या भाजप (BJP) सरकारविरोधात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत 'केसीआर' यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर 'केसीआर' यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, हे अजून समजू शकले नाही. या आज दुपारी चार वाजता केसीआर आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातही एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीकडे देशातील राजकीय वर्तुळाते लक्ष लागले आहे. राव यांनी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरसंधान साधले आहे. त्यांनी केंद्रातल्या भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

 Uddhav Thackeray, K. Chandrasekhar Rao
Panjab Election 2022 निवडणूकीच्या तोंडावर नवज्योत सिंग सिद्धूंवर फौजदारी गुन्हा दाखल

त्यांनी यापूर्वीच ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादला येणार असल्याचेही संकेत दिले होते. राव म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला बंगालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होता. किंवा आपण हैदराबादला येऊ असे सांगितले. त्यांनी मला डोसा खावू घाला, अशी विनंती केली होती. मी त्यांचे कधीही स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे ममता बॅनर्जीही लवकरच हैदराबादला भेट देऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com