Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात सामान्य नागरिक भरडले जाणार; सीमा भागातील बसेसला ब्रेक

Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे एसटी महामंडळाचा निर्णय
S.T. Bus
S.T. BusSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं. तर आज बेळगावजवळ कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले.

पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) महाराष्ट्रातून येणाऱ्या एसटी बसेसना कर्नाटकात न पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर एसटी महामंडळाने देखील मोठा निर्णय घेतला आहे.

S.T. Bus
Shivsena : भाजपच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला आहे का ?

कर्नाटक पोलिसांच्या सुचनेनुसार, एसटी महामंडळाने (ST Mahamandal) निर्णय घेत एसटी बसचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सीमा भागातील गाड्यांना तात्पुरता ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे सीमा भागातील सर्वसामान्य प्रवाशी वर्गाचे हाल होणार असल्याने त्यांना मात्र त्रासाला सामोरं जाव लागणार आहे.

S.T. Bus
शिंदे गटाची जय्यत तयारी! बारणे, आढळराव पाटील लागले कामाला; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा सपाटा

दरम्यान, महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावमध्ये (Belgaum) कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. तसेच महाराष्ट्रातील गाड्यांवर झालेल्या हल्यानंतर दोन्ही राज्याच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर हल्ले थांबले नाहीत तर कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटकला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com