Ambadas Danve News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपचे आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व अन्य Bjp भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विजापूरच्या दरबारात ज्या प्रमाणे अफझलखानाने शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी विडा उचलला होता, तसा आताच्या भाजपच्या नेत्यांनी दिल्लीच्या दरबारात महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला की काय? (Shivsena) अशी शंका त्यांच्याकडून होणाऱ्या विधानांवरून आल्याशिवाय राहत नाही, असा टोला देखील दानवे यांनी लगावला. (Marathwada)
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी नाक घासत माफी मागितली पाहिजे, नाही तर राज्यातील जनता त्यांना टकमक टोकावर घेऊन जाईल, असा इशारा देखील दानवे यांनी दिला. प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानवर भाष्य केले.
दानवे म्हणाले, राज्यपाल आणि त्यानंतर भाजपच्या अन्य नेत्यांकडून महाराजांबद्दल जी विधाने केली गेली ती चुकून नाही, तर ठरवून केली गेली आहेत. शाळेतल्या लहान मुलाला देखील शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे हे माहित आहे. अन् भाजपचा आमदार म्हणतो शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला.
राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांना खरतर आता शिवतीर्थावर, शिवनेरी किंवा रायगडावर नेवून नाक घासत माफी मागायला लावली पाहिजे, नव्हे त्यांनी ती मागितलीच पाहिजे. अन्यथा त्यांना आता जनता टकमक टोकावर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जी-२० संदर्भात बोलतात, पण त्यांनी तिकडे न पाहता राज्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. जी-२० हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. तो सोडवण्यासाठी त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत, मग त्यांनी एवढ्या वरच्या गोष्टी करू नयेत, असा टोला देखील दानवे यांनी बावनकुळे यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.