Priyanka Chaturvedi : शिवसेना-मनसे युतीत मराठीचा अजेंडा; ठाकरेंच्या हिंदी भाषिक शिलेदार म्हणाल्या, 'मी उत्तर भारतीय, पण...'

Thackeray Brothers Mumbai BMC Alliance: Priyanka Chaturvedi Reacts : ठाकरे बंधूंच्या मुंबई महापालिकेतील युतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : ठाकरे बंधूंची युती मुंबई महापालिकेत मराठी मुद्दा घेऊन मतदारांसमोर जात आहे. मुंबईत उत्तर भारतीय भाषिक खूप आहे. मराठी हा मुद्दा कितपत यशस्वी होईल, यावर राजकीय विश्लेषकांकडून मीमांसा सुरू आहे.

यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर प्रतिक्रिया देत, मराठी अन् उत्तर भारतीय भाषिकांवरून मुद्दा तापवणाऱ्यांचं तोंड गप्प केलं आहे.

खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, "ठाकरे बंधूंची युती योग्य वेळी होत आहे. मी उत्तर भारतीय आहे. खूप चॅलेंज आहेत. पण हा महाराष्ट्र आहे, मराठींचं राज्य आहे. मराठी लोकांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊनच ठाकरे बंधूंची युतीचा अजेंडा असणार आहे."

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र येणे, ही राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार खूप गरजेचे होतं. महाराष्ट्रातील जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधूंची युती खूप महत्वाची ठरणार आहे. ठाकरे बंधू जनतेचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज असणार आहे. जनतेचा तक्रारींचा आवाज आता ठाकरे बंधूंच्या माध्यमातून महाराष्ट्रात घुमणार आहे."

Priyanka Chaturvedi
VBA Congress alliance : 'पहले आप, पहले आप' अन् आघाडीत कोणीच नाही! काँग्रेस अन् वंचितचं फिस्कटलं!

"महाराष्ट्रात महापालिकेच्या साडेतीन वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. मुंबई महापालिकेकडे जे पैसे होते, ते देखील लूट करून खाऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराने आक्राळ-विक्राळ रूप घेतलं आहे. जनता त्रस्त आहे अन् हे सत्ताधारी मस्त आहे. हा सर्व भ्रष्टाचार संपवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती गरजेची होती. ही युती मुंबईत ऐतिहासिक विजय मिळवले," असा विश्वास प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.

Priyanka Chaturvedi
Congress reaction on Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या आरोपाशी सहमत, मात्र मुंबई महापालिकेत आघाडी नाही; वडेट्टीवारांनी स्पष्ट केली भूमिका

महायुतीचं तगडं आव्हान आहे, यातच विरोधक देखील, ठाकरे बंधूंबरोबर दिसत नाही, यावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "सत्ताधारी किंवा विरोधक कुणीही बरोबर नसू द्या. पण जनता आमच्या बरोबर आहे. आघाड्या होतात, तुटतात. आघाड्या वेगवेगळ्या रूपात समोर येतात." पण जनतेच्या अपेक्षा खूप काही आहेत. ठाकरे बंधूंची युतीच जनतेच्या अपेक्षा प्राधान्याने पूर्ण करू शकते, असेही प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले.

ठाकरे बंधूंच्या युतीत मराठी माणूस हा मुख्य अजेंडा आहे. मग, उत्तर भारतीय मतदानांसमोर कसं जाणार, यावर बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "मी उत्तर भारतीय आहे. पण शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर आहे. उत्तर भारतीय आहे म्हणून, आपण इतरांना बरोबर घ्यायचं नाही. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. चॅलेंज वेगळे आहेत. या सर्वांवर चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्र आहे, मराठींचं राज्य आहे. मराठी लोकांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊनच ठाकरे बंधूंची युतीचा अजेंडा असणार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com