Congress reaction on Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या आरोपाशी सहमत, मात्र मुंबई महापालिकेत आघाडी नाही; वडेट्टीवारांनी स्पष्ट केली भूमिका

Congress Won Contest BMC with Thackeray Brothers Alliance Says Vijay Wadettiwar : ठाकरे बंधू यांच्या युतीला शुभेच्छा देताना, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेवर विजय वड्डेटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Congress reaction on Thackeray alliance
Congress reaction on Thackeray allianceSarkarnama
Published on
Updated on

Congress BMC election stand : मुंबई बळकावण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.

या ठाकरे बंधूंच्या आरोपाशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सहमती दर्शवली. दोन्ही भावांच्या युतीला शुभेच्छा देताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या आपसातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तो वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जाहीरपणे सांगितले. मुंबईचा महापौर मराठी माणूसच आणि आमचाच होईल असाही दावा दोन्ही ठाकरे यांनी केला. यावर वडेट्टीवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुंबई (Mumbai) वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी लढले पाहिजे. मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी सर्वांना लढावे लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर आघाडी करण्याची काँग्रेसची इच्छा होती. मनसे बाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती.

Congress reaction on Thackeray alliance
Top 10 News : पवारांचा 'अल्टिमेटम'! PMबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे भाष्य, 'भाजपचा 'शनी शिंगणापूर'; वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात. त्यामुळे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला अस मानण्याचे कारण नाही.

Congress reaction on Thackeray alliance
Rohit Pawar On ShivSenaUBT MNS alliance : 'दोन दिवस पाहू, नाहीतर..'; ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच, पवारांचा 'अल्टिमेटम'!

काँग्रेस हा जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे राहावे असे आवाहन यावेळी काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी मुंबई, नाशिकसह सर्व महापालिकेमध्ये युती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणाला किती जागा देणार हे सांगण्यास नकार दिला. सध्या लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे. त्यात आता आणखी दोन पक्षांची भर पडली असल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लागवाल. दोन्ही ठाकरे बंधूनी जाहीर केलेला निर्णय बघता काँग्रेस आता आघाडी करणार नाही तर स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com