मुंबई : विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनुपस्थितीमुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करुन मुख्यमंत्रीपद रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावे, असा टोमणा लगावला आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. ''राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही,'' अशी बोचरी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटलांनी आज पुन्हा टि्वट करीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या टि्वटमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, ''मविआ सरकारचा अधिवेशनातील रस हा ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे, १९ विधेयके संमत करून घेणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम डावलून आवाजी मतदान पद्धतीने घेणे यापुरताच आहे,''
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील वादाचा गुरुवारी भडका उडाला. 'आव्हाडांनी माझा बाप काढला. ही त्यांची संस्कृती आहे. पण आव्हाडांना उद्धव ठाकरे हे त्यांचा बाप वाटत असावेत; ठाकरेंशी जवळीक करून त्यांना फाईल क्लेअर करून घ्यायची असेन,” अशा शब्दांत प्रत्युत्तर देत, पाटील यांनी आव्हाडांवर घणाघातच केला. परिणामी, विधीमंडळात राजकीय संघर्ष आता आव्हाड आणि पाटलांच्या घरापर्यंत गेला आहे.
''मुख्यमंत्र्यांना काम जमत नसेन ; तर मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार रश्मी ठाकरे किंवा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा,'' अशी सूचनावजा खोपरखळी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात मारली. त्यावरून कोणी आजारपणात असताना बोलू नये, अशी विनंत करीत, आव्हाडांनी आपला बाप आजारी असेन; आपण बोलतो का ? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावरून संतापलेल्या पाटलांनीही आव्हाडांना त्याच भाषेत उत्तर देऊन मोकळे झाले.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा, थेट आव्हाडांवर पाटील बोलले. चंद्रकांत पाटील म्हणाले, "माझ्यावर आरएसएसचे संस्कार आहेत. मी कोणाला वाईट बोलत नाही मात्र, आव्हाडांनी माझा बाप काढल्याने त्यांची संस्कृती दिसून आली. माझा बाप राजकारणात किंवा सत्तेत नव्हता. त्यामुळे ते जबाबदार घटक ठरत नाहीत. मुख्यमंत्री हे जबाबदार असल्याने मी प्रश्न उपस्थित केला. अशा काळात कामांवर परिणाम नको म्हणून त्यांची विभागणी सूचविली. त्यामुळे आव्हाडांनी एवढा आक्रस्ताळेपणा करायला नको होता." "ठाकरेंशी जवळीक करून आव्हाड यांना एखाद्या फाईलचे काम करून घ्यायचे असेन; म्हणून ते एवढे बोलले, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.