मुंबई : राज्य सरकारने वाईन उद्योगाला (Thackeray Govt allows wine sale in grocery supermarket)) चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एक हजार चौरस फूटापेक्षा मोठ्या दुकानांत शोकेस निर्माण करून वाईन विकता येईल. ही वाईन सध्या बार किंवा मद्याच्या दुकानांतच मिळते. ती आता ग्रोसरी स्टोअरमध्येही मिळू शकेल.
या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मलिक यांनी या धोऱणाचे समर्थन केले आणि त्याचा फायदा शेतकर्यांना होईल, असा दावा केला. शेती उत्पादनाला चालना मिळेल. वायनरी राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना याचा फायदा होईल. भाजपने गोव्यात, हिमाचलमध्ये, तसेच इतर भाजप शासित राज्यात हेच धोरण आणले आहे. तसेच धोरण महाराष्ट्राने आखले आहे, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात वाईन उत्पादनासाठी दहा वर्षे अबकारी कर माफ होता. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.
नवीन शिक्षण धोरण तयार करण्यासाठी माशेलकर समितीने आपला अवहाल सादर केला. तो आज मंत्रीमंडळापुढे मांडण्यात आला. या अहवालावर विचार करण्यसााठी मंत्री गट तयार केला जाणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
शासकीय विभागांकडे असलेली वीज थकबाकी वरून ऊर्जामंत्री नितीन राऊत कॅबिनेटमध्ये विषय उपस्थित करणार अशी चर्चा होती. याविषयी विचारले असता कॅबिनेटमध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मलिक यांनी सांगितले.
या मंत्रीमंडळ बैठकीला बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर ते बैठकीतून निघून गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.