भाजपचं अखेर ठरलं; उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी त्रिदेव फॉर्म्युला!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Utrar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. हे राज्य भाजपसाठी सर्वांत महत्वाचे आहे. यामुळे भाजपने (BJP) आता बूथ पातळीपासूनच रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. यासाठी त्रिदेव हा नवा फॉर्म्युला यंदा भाजप वापरणार आहे.

निवडणुकीची रणनीती ठरवताना भाजप हा विरोधकांवर कायम एक पाऊल पुढे असतो. याची प्रचिती आता उत्तर प्रदेशातही येऊ लागली आहे. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशसह 5 राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशसह गोवा व उत्तराखंडसाठी भाजपने निवडणूक रणनीतीची अंमलबजावणी सुरू केली आहे. भाजपच्या समोर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे प्रमुख आव्हान आहे. त्यांना तोंड देण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्यासह ही त्रिदेव योजना अंमलात आणली आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
ठाकरे सरकारची फडणवीसांना क्लिनचिट? राज्य सरकारनेच केला मोठा खुलासा

पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन व अन्य प्रश्नांची धग निवडणूक रणधुमाळीपर्यंत थंड होईल, असा पक्षनेतृत्वाचा होरा आहे. नव्या त्रिदेव योजनेत पक्षाचे गावपातळीवरील लाखो कार्यकर्ते, बूथ प्रमुख व बूथ प्रभारी यांचा प्रत्यक्ष सहभाग असेल. दुसऱ्या पक्षातील प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये आणण्यावर भर देण्यात येणार आहे. गावागावांत व घरोघरी जाऊन राज्य व केंद्र सरकारची कामे, कोरोना व्यवस्थापन, शेतकऱयांसाठीच्या योजना समजावून सांगणे ही जबाबदारी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांवर असेल. याचबरोबर जास्तीत जास्त तरूणांची मतदार म्हणून नोंदणी करून त्यांना पक्षाकडे वळवणे, हा उद्देश असणार आहे. दिवाळीनंतर राज्यात विशेष मतदार मेळावे होणार आहेत. हे मेळावे 7, 13, 21 व 28 नोव्हेंबरला घेतले जाणार आहेत. मतदार वाढवण्यासाठी कार्यशाळाही प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येतील.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
मुंबई पोलिसांवर नामुष्की; अमली पदार्थ विरोधीच्या कर्मचाऱ्यांनी मागितली पानवाल्याला लाच

त्रिदेवच्या अंमलबजावणीवर भाजप नेतृत्वाचे थेट दिल्लीतून लक्ष रहाणार आहे. भाजपमध्येही सध्या देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे पी नड्डा असे त्रिदेव नेतृत्वच आहे. राजकीय जाणकार सईद अंसारी यांच्या म्हणण्यानुसार, भाजप नेतृत्वाकडे कायम प्लॅन बी तयार असतो . पक्ष संघटनेची एखादी योजना यशस्वी ठरत नाही असे दिसताच भाजप तातडीने प्लॅन बी आणतो. पक्षनेते, प्रवक्ते आणि प्रभारींना याबाबत सूचना दिल्लीतून दिल्या जातात. काही तासांत या दुसऱया योजनेची अंमलबजावणीही सुरू होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com