Thackeray Vs Shinde Group : खोके अन् गद्दार दिनाला स्वाभिमान दिनाने उत्तर; ठाकरे-शिंदे गटात आजही रंगणार कलगीतुरा

Gaddar, Khoke and Swabhiman Divas : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीस
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन शिवसेनेत गेल्या वर्षी बंड करण्यात आले होते. त्या बंडाला आज २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष वेगवेगळे दिवस साजरे करणार आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, सोमवारी (ता. १९ जून) दोन्ही शिवसेनेच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. तसेच आमचीच शिवसेना खरी असेही त्यांनी ठासून सांगितले. त्यानंतर आज म्हणजेच मंगळवारी (ता. २० जून) तत्कालीन शिवसेनेत झालेल्या बंडाची वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त ठाकरे गटाकडून खोके दिनाचे आयोजन केले जाणार आहे. तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकापातळीवर गद्दार दिन साजरा करण्यार आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
New Survey Vidhansabha : कुणी कितीही दावा करू द्या, पिंपरी-चिंचवडमध्ये 'याच' आमदारांचे वर्चस्व; काय सांगतो नवा सर्व्हे ?

शिवसेनेत बंड करणाऱ्या आमदारांना ठाकरे गटाकडून 'खोके गँग', 'गद्दार' म्हणून हिणवले जात आहे. हाच संदर्भ घेत आज महाविकास आघाडीतील ठाकरे गट 'खोके दिन' तर राष्ट्रवादी काँग्रेस 'गद्दार दिन' साजरा करणार आहे. तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे स्वाभिमानातून बंड केल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गट आज राज्यभरात 'स्वाभिमान दिन' साजरा करणार आहे. या दिनांच्या निमित्ताने राज्यात पुन्हा कलगीतुरा रंगणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापणार आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Sanjay Raut Letter To UN: संजय राऊतांचं थेट 'युनो'ला पत्र; 20 जून 'जागतिक गद्दार दिन' जाहीर करा..

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उद्या गद्दार दिवस आहे. तो साजरा केला पाहिजे, असे आवाहन केले होते. दरम्यान, मुंबईतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत. गद्दार दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत. यामुळे ठाकरे-शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com