Thackeray-Shinde Politics: श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्येच गाठणार; ठाकरेंनी जाळे टाकले

Maharashtra Politics: कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघासाठी शिंदे गट आणि भाजपमधील राजकारण रंगले असतानाच यात ठाकरे गटानेही उडी घेतली आहे.
Thackeray-Shinde Politics:
Thackeray-Shinde Politics: Sarkarnama

Mumbai News : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघासाठी शिंदे गट आणि भाजपमधील राजकारण रंगले असतानाच यात ठाकरे गटानेही उडी घेतली आहे. लोकसभेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखली आहे. त्यासाठी त्यांनी नुकतीच बोरिवली मागाठाणे आणि कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक ही जागा आपल्याला जिंकायची आहे, असा निर्धारच केला. यामुळे आता कल्याण डोंबिवलीतही शिंदे गट-भाजप आणि ठाकरे गटाचं राजकारण चांगलंच रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Thackeray-Shinde Politics:
Mhaswad Bandh News: भिडे यांच्या निषेधार्थ म्हसवडला बंद; सर्वपक्षीयांचा 'रास्ता रोको'

विधानसभा संपर्कप्रमुखांनी आणि बूथ प्रमुखांनी सक्रिय व्हावं. पदाधिकारी, कार्यकत्यांनीही कामाला लागा. मतदारसंघात फिरत राहा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तसेच, ज्या मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. ज्यांना कागदपत्रांची अडचण आहे, त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या कागदपत्रांच्या अडचणी सोडवा. निवडणुका केव्हाही लागू शकतात, त्यासाठी तयार रहा,असा सूचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.

Thackeray-Shinde Politics:
PM Narendra Modi News: आम्ही एखाद्या रस्त्याचे नाव बदलले तरी काहींना पोटशूळ उठतो; मोदींची विरोधकांवर टीका

खासदार श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला मानला जाणार कल्याण-डोंबिवली मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महापालिका निवडणुकाही रखडल्या आहेत.दुसरीकडे भाजप- शिंदे गटाने निवडणुकांची केलेली तयारी पाहता आता विरोधी पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार नेस्ताबूत करण्यासाठी ठाकरे गटही आक्रमक झालेला दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुका असोत वा विधानसभा, लोकसभा निवडणुकामध्ये सर्वच राजकीय पक्षांची ताकद पणाला लागणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com