Thackeray Vs Shinde : ठाकरे करणार शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम? आखला 'हा' मास्टर प्लॅन

Uddhav Thackeray : शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन तयार
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेनेत बंड झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेकवेळा दोन्ही गटाचे पदाधिकारी आमने-सामनेही आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखत मेगा प्लॅन तयार केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

ठाकरे आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असून ज्या ठिकाणी पक्षाकडे उमेदवार नाहीत, अशा आठ जांगावर बाहेरच्या उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर जेथे पक्षाची ताकद आहे तेथे पक्षातील पदाधिकाऱ्यालाच संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याने काय साधणार? 'ही' आहेत दौऱ्यामागची पाच कारणं..

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच रणनीती आखण्यास सुरवात केली असून याबाबतची चाचपणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून समजती आहे.

माहिममध्ये सदा सरवणकर यांच्या विरोधात विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्या विरोधात हर्षल कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Pune DPDC : 'डीपीडीसी'तील मंजूर कामांच्या श्रेयबाजीतून आजी-माजी आमदारांत जोरदार जुंपली!

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना''मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार'', असं खुलं आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे ठाकरेंनी आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com