Thane News: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील रेव्ह पार्टी उधळली; वसईत दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

31st Rave Party Police Action : 90 युवक आणि 5 महिला ताब्यात
Thane News
Thane NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane : नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पोलिसांनी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळली, तर वसईत अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या संशयावरून केलेल्या कारवाईत 90 युवक आणि 5 महिलांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. वसईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने १ कोटी ४७ लाखांचे ड्रग्ज पकडल्याने खळबळ उडाली आहे.

मिरा-भाईदर, वसई-विरार परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थाचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. वसई, आचोळे, तुळींज, मोरेगांव, प्रगतीनगर, ९० फुटी रोड, हायटेन्शन रोड परिसरात पोलिसांची गस्त सुरु असताना दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.

प्रगतीनगरच्या हायटेन्शन रोडवरुन बसेरा इमारतीकडे येत असताना शिवकृपा इमारतीसमोर दोन नायजेरियन व्यक्ती हे एकमेकांशी बोलत होते. त्यांच्याकडे दोन सॅक होत्या. त्यांच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडील १ कोटी १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ५५४.४ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन व ३६ लाख १२ हजार रुपये किंमतीचे १२०.४ ग्रॅम वजनाचे कोकेन आदी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. दिवाईन चुकवूमेका आणि चिकवु फ्रेडिंनंद ओकीतो नवमारी या दोघाच्या विरोधात तुळींज पोलिस ठाण्यात एनडीपीएस कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज रविवार) पहाटे ठाण्यात रेव्ह पार्टीच्या कारवाईत अटक केलेल्यांना दुपारी ठाण्याच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी डोंबिवली येथे राहणाऱ्या तेजस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या सुजल महाजन या दोघांना अटक केली आहे. पार्टीच्या ठिकाणी अंमली पदार्थ दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

Thane News
Maan Political News : 'ते' ज्यांना टिळा लावतील 'ते' साताऱ्याचे खासदार होतील!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com