Thane Guardian Minister: राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांची जुंपली; आजी-माजी आमदार आमने-सामने

Raju Patil vs Vishwanath Bhoir: ठाणे जिल्ह्यात आमदार गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळाले नसल्याने आगरी समाज नाराज असल्याचे वक्तव्य राजू पाटील यांनी केले होते.
Eknath Shinde, Raj Thackeray
Eknath Shinde, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai 22 Jan 2025: पालकमंत्री पदावरून युती सरकारमध्ये राजकीय गदारोळ सुरू आहे. महायुतीमधील पालकमंत्री पदाचा वाद अजूनही क्षमलेला दिसत नाही. काही जिल्ह्यातील महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरुन मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये जुंपली आहे.

मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी याविषयावर तोंडसूख घेतल्यानंतर आता त्याला शिदेंचे शिलेदार कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रत्युत्तर देत राजू पाटलांना फटकारलं आहे. ठाणे जिल्ह्यात आमदार गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळाले नसल्याने आगरी समाज नाराज असल्याचे वक्तव्य राजू पाटील यांनी केले होते.

Eknath Shinde, Raj Thackeray
Shiv Sena: शिंदेंची सेना फुटीच्या मार्गावर? आग लागल्याशिवाय धूर निघणार नाही! शरद पवारांच्या खासदाराचे सूचक वक्तव्य

पालघर, रायगड, गडचिरोली यांची पालकमंत्री पद हवीत कशासाठी ? सेवा करायला की मेवा खायला ? हे राजकारण्यांना माहीत आहे. त्यामुळे जे काय चाललंय ते त्यांना लखलाभो असा टोला राजू पाटील यांनी मंगळवारी समाज माध्यमावर लगावला होता. "पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतील त्या पद्धतीने गणेश नाईक करतील का? याविषयी शंका आहे," असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde, Raj Thackeray
Valmik Karad Case Updates: CID चौकशीनंतर भाजप नेत्याचे स्पष्टीकरण; मी आणि वाल्मिक कराड एकाच जातीचे म्हणून...

शिंदे यांच्याकडे पालकमंत्रिपद आलं यात काही गैर नाही. गणेश नाईक पण मंत्री आहेत, समाजातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा पण विचार व्हायला पाहिजे होता. पण मला वाटतं एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पालकमंत्रि पदाचा उपयोग सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी, सामान्य जनता यांना जास्त होईल.

ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक यांना पालकमंत्रिपद मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून केली गेली. त्यावर राजू पाटील यांनी ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाला ठेंगा, असे ट्विट केले होते. आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे. ते असते तर आगरी समाजाला ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती त्या अनुषंगाने मी हे ट्विट केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com