Thane News: ठाण्यातील तीनही जागा जिंकण्याचा शिंदेंचा निर्धार; राम मंदिर बांधण्यासाठी मोदींना...

Shrikant Shinde News: 'अब की बार ४०० पार'
Shrikant Shinde News
Shrikant Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर

Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार रविवारी ठाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला. याचदरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी राम मंदिर बांधण्यासाठी मोदींना जन्म घ्यावा लागला. तसेच रामराज्य आणण्यासाठी ते विकासाची कामे करत आहेत. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात जे झाले नाही, तेवढी कामे दीड वर्षात झाली असून देशाचे नेतृत्व करणाऱ्या मोदींसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. तसेच 'अब की बार ४०० पार' असा ही नारा यावेळी खासदार शिंदे यांनी दिला.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले), पीआरपी, बविआ, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब. रि. एकता मंच, रिपब्लिकन पक्ष (खरात), शिवसंग्राम आदी १५ पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचे नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात आणायच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे. तर, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता, तर दहा वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते. असे म्हणाले. मोदींना तिसऱ्यांदा जिंकून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे. येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावे, असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

Edited by: Mangesh Mahale

Shrikant Shinde News
BJP Rajasthan: राजस्थानमध्ये भाजप 'या' चेहऱ्यांवर डाव टाकणार; विजयी आमदारही लढवणार लोकसभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com