Naresh Mhaske Vs Sanjay Raut : नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट, म्हणाले 'संजय राऊतांनी बंडाचा विषय काढत...'

Thane Loksabha Constituency : राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का ? असा सवालही नरेश म्हस्केंनी केला आहे.
Naresh Mhaske, Sanjay Raut
Naresh Mhaske, Sanjay RautSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान झाले असून, उर्वरीत टप्प्यांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचाराला आणखीच जोर चढला आहे. शिवाय, सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही जोरदार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे.

या ठिकाणी महायुतीने शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे रिंगणात आहेत. या लढतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये चांगलीच शाब्दिक लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे.(Thane Loksabha Constituency)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naresh Mhaske, Sanjay Raut
Thane Lok Sabha Election : ठाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट अस्तित्वासाठी भिडणार; बाण चालणार की मशाल पेटणार?

नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत एक विधान करून गौप्यस्फोट केला आहे. 'अयोध्यामध्ये मी स्वत: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत(Sanjay Raut) एकत्र बसलो होतो यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असे सांगितले.' असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आयोध्याच्या मुद्यावरुन हा गौप्यस्फोट केला.

याचबरोबर 'राजन विचारे(Rajan Vichare) यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. एक महिन्यापासून काम करतात, मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असे बोलणे साफ चुकीचे आहे. राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का ? त्यांच्याकडे टीका करण्यापलिकडे आता काही शिल्लक राहिलेले नाही.' अशी टीका देखील म्हस्के यांनी केली.

Naresh Mhaske, Sanjay Raut
Kalyan Lok Sabha Election : मोदी, ठाकरे, पवार गाजवणार कल्याण डोंबिवलीचे मैदान

याशिवाय 'आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली आहे. संस्कृती परंपरा टिकविण्याचे काम आम्ही केले असल्याचेही ते म्हणाले. ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचे म्हस्के म्हणाले. तसेच, राज घराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे, शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत. असंही नरेश म्हस्के(Naresh Mhaske) म्हणाले.

दरम्यान, म्हस्के यांची प्रचार रॅली  मीनाताई ठाकरे चौक, कॅसलमील नाका, आदर्शनगर, कोलबाड रोड, उथळसर, दादापाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा आदी भागातून फिरली. त्यानंतर  धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडार आळी, गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातून गेली. ठाणे शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा घरा-घरांमध्ये प्रचार सुरू केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com