Thane Lok Sabha Election : ठाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट अस्तित्वासाठी भिडणार; बाण चालणार की मशाल पेटणार?

Lok Sabha Election 2024 Phase 3 : दोन्ही शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर काही इतर पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब आजमावत आहेत.
Thane Lok Sabha Election
Thane Lok Sabha ElectionSarkarnama

Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही शिवसेनेसाठी ही अस्तित्वासाठी लढाई असणार आहे. शिवसेनेचा पहिला महापौर ठाण्याने बनवला होता.

त्यामुळे ठाणे म्हणजे शिवसेना असे समीकरणच बनले होते. मात्र आता पक्षफुटीनंतर दोन्ही गटाकडून ठाण्यावर जोरदार दावा करण्यात येत आहे. मात्र लोकसभेच्या निकालात कोणत्या शिवसेनेचे यावर वर्चस्व असेल, याची स्पष्टता होणार आहे. (Latest Marathi News)

ठाण्याच्या लोकसभा मतदारसंघात 24 लाख 90 हजार 513 मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात नवोदित मतदारांची संख्या जवळपास 35 हजार एवढी आहे. ठाणे लोकसभेमध्ये कोपरी-पांचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

यामध्ये ठाणे, मिरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर या चार ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, तर कोपरी-पांचपाखाडी, ओवळा-माजिवाडा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर ठाकरे गटाचा एकही आमदार या लोकसभेत नाही.

(राजकराणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे व्हाट्स अॅप चॅनेल फॉलो करा)

Thane Lok Sabha Election
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं
Thane Lok Sabha Election
Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

थेट लढत -

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे सिटींग खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध शिंदे यांचे उमेदवार नरेश म्हस्के यांची थेट भिडत ठाण्यातून होणार आहे. दोन्ही शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर काही इतर पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब आजमावत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com