Naresh Mhaske News : 'आमचे काम 365 दिवस सुरू त्यामुळे भीती वाटत नाही', नरेश म्हस्के यांची पहिली प्रतिक्रिया !

Lok Sabha Election 2024 : निष्ठावंत कोण ज्यांनी बाळासाहेबांची भूमिका खुंटीला टांगली ते निष्ठावंत कसे असू शकतात, असा प्रश्न म्हस्के यांनी विचारला..
Naresh Mhaske Thane Loksabha
Naresh Mhaske Thane LoksabhaSarkarnama
Published on
Updated on

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी मिळाली आहे. अशाप्रकारे कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिली. हे फक्त शिवसेनेत होऊ शकते. याशिवाय आमचे काम हे 365 दिवस सुरू असते. त्यामुळे भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हस्के म्हणाले, ठाण्यातील शिवसेना- भाजप आणि मनसे या पक्षांचे सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद माझ्यावर असून त्यांनी दाखविलेला विश्वास मी खरा करेन. या संधीचं सोने करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे,त्या भूमिकेशी प्रामाणिक राहीन.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naresh Mhaske Thane Loksabha
Devendra Fadnavis News : "...तर मी सोडणार नाही," फडणवीसांचा धैर्यशील मोहिते-पाटलांना थेट इशारा

निवडणुकीच्या प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही आणि कार्यकर्ते कायमच लोकांची कामं करत असतो. त्यांनी केलेल्या या कामाची मला पोहच पावती मिळेल. आमचे काही मेळावे ठाण्यात झालेले आहेत. आमचे काम 365 दिवस सुरू असते. त्यामुळे आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही,असेही म्हस्के म्हणाले. आम्ही ज्या दिवशी अर्ज भरू त्यादिवशी काय गर्दी असते हे विरोधकांना समजेल, असा टोला देखील त्यांनी नाव न घेता, उद्धव ठाकरेंना लगावला.

निष्ठावंत कोण ज्यांनी बाळासाहेबांची भूमिका खुंटीला टांगली ते निष्ठावंत कसे असू शकतात, असा प्रश्न म्हस्के यांनी विचारला आहे. ठाण्याचे (Thane) विद्यमान खासदार कोरोनाच्या काळात घरी बसले होते, हे ठाण्यातील मतदारांनी पाहिले आहे, असा चिमटा त्यांनी राजन विचारे यांना काढला. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून काम करत होते. त्यामुळे ठाण्यातील जनतेला कोण कसं आहे माहीत आहे. ठाणेकर नागरिक कोणाच्या बाजुने आहेत, याचं उत्तर येत्या 20 तारखेला मिळेल, असेही म्हस्के म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Naresh Mhaske Thane Loksabha
Prithviraj Chavan On Narendra Modi : ...म्हणून मोदींकडून शेतकऱ्यांचा सूड, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com