
Thane politics : ठाणे जिल्ह्यात भाजपला जोरदार झटका बसला आहे. मुरबाड नगरपंचायतीमधील भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपच्या 12 पैकी नऊ नगरसेवकांनी ‘मुरबाड परिवर्तन पॅनेल’ असा नवीन गट तयार केला आहे.
नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष संतोष ऊर्फ बाबू चौधरी आणि उपनगराध्यक्ष दीक्षिता वारे, हे दोघेही या नवीन गटात सामील झाल्याने मुरबाड नगरपंचायतीतील ‘भाजप राज’ संपुष्टात आले आहे.
मुरबाड नगरपंचायतीमधील भाजपच्या (BJP) 12 पैकी नऊ नगरसेवकांनी केलेली बंडखोरी, हे विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपचे 12 नगरसेवक होते. त्यापैकी नऊ नगरसेवकांनी वेगळा गट तयार केल्यामुळे भाजप अल्पमतात आला आहे.
नगरपंचायतीत वेगळा गट तयार झाल्याने भाजपकडे माजी नगराध्यक्ष मुकेश विशे, माजी उपनगराध्यक्षा मानसी देसले आणि नगरसेविका मधुरा सासे, असे तीन सदस्य उरले आहेत. मुरबाड नगरपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचे (Shivsena) पाच आणि 12 नगरसेवक भाजपचे होते.
या 12 पैकी नऊ नगरसेवकांनी वेगळा गट तयार केला असून, त्याचे ‘मुरबाड परिवर्तन पॅनेल’ असे नामकरण करण्यात आले आहे. या गटाचे गटनेते म्हणून मोहन भालचंद्र गडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या गटाला मान्यता दिल्याचे पत्र जिल्हाधिकारी ठाणे यांनी सोमवारी पाठविले आहे. त्यामुळे भाजपकडे फक्त तीन नगरसेवक उरले आहेत तर शिवसेनेकडे पाच नगरसेवक कायम आहेत.
मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार कथोरे यांनी भाजपचा उमेदवार उभा न करता शिवसेनेच्या उमेदवार नम्रता तेलवणे यांना उमेदवारी दिली होती. परंतु भाजपमधील नगरसेवकांना शिवसेनेला उपनगराध्यक्ष पद देणे आवडले नाही. त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेऊन नम्रता तेलवणे यांच्याविरोधात मतदान करून नगरसेविका दीक्षिता वारे यांना निवडून दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.