Thane Muncipal Rsult : ठाणे महापालिकेत तरुणांना संधी, विक्रम तांडेल, मंदार केणींना सर्वाधिक मताधिक्क!

Vikram Tandel Mandar Keni : ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदेंनी सत्ता मिळवली. त्यांच्या पक्षाकडून तरुण चेहरे निवडणुकीच्या मैदानात होते.
Eknath Shinde Mandar Keni
Eknath Shinde Mandar Kenisarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane News : ठाणे महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढविणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या मंदार केणी आणि विक्रांत तांडेल या दोन तरुण उमेदवारांनी घवघवीत यश संपादन करत सर्वाधिक मते मिळविण्याचा मान पटकावला आहे. दोघांनाही २० हजारांहून अधिक मते मिळाली असून विशेषतः मंदार केणी यांनी १५ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत विक्रम केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागातील १३१ जागांसाठी निवडणुकी पार पडली. या निवडणुकीसाठी १६ लाख ४९ हजार ८६९ मतदारांपैकी ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मागील वर्षीच्या ५८.८ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत ५५.५९ घट झाल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीसाठी १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Eknath Shinde Mandar Keni
Raj K Purohit Passes Away : मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचं निधन, मुलाच्या विजयानंतर दोनच दिवसांनी घेतला अखेरचा श्वास

यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत घोडबंदर येथील प्रभाग क्रमांक १ मधून शिंदेच्या शिवसेनेचे विक्रांत तांडेल यांनी २० हजार ४०० मते मिळवत सर्वाधिक मते मिळविण्याचा मान पटकावला. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमिला गावित यांचा पराभव केला. गावित यांना ९,२९८ मते मिळाली, तर तांडेल यांना ११,१०२ मतांचे मताधिक्य मिळाले.

केणींना सर्वाधिक मताधिक्क

दरम्यान, कळवा येथील प्रभाग क्रमांक २३ मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत या प्रभागातून शिंदेच्या शिवसेनेचे मंदार केणी यांनी पहिल्याच निवडणुकीत २० हजार ३९९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेना (उबाठा)चे विलास गायकर यांचा पराभव केला. गायकर यांना केवळ ५,२४३ मते मिळाली. मंदार केणी यांना १५,१५६ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळाले असून ते या निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे नगरसेवक ठरले आहेत.

Eknath Shinde Mandar Keni
University teachers recruitment : ‘आता सबब नको!’ सर्वोच्च न्यायालयाचा चार महिन्यांचा अल्टीमेटम; विद्यापीठांतील रिक्त पदे तातडीने भरा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com