Kalyan-Dombivali News : आता बॅनरवरुन कलगीतुरा; भाजपने लावलेला 'तो' बॅनरच गेला चोरीला!

Bjp News : उल्हासनगर शहरात शिवसेना, भाजपामध्ये बॅनरवॉर सुरु आहे.
Kalyan-Dombivali News
Kalyan-Dombivali NewsSarkarnama
Published on
Updated on

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरात शिवसेना, भाजपामध्ये बॅनरवॉर सुरु आहे. भाजपने बुधवार रात्री '५० कुठे आणि १०५ कुठे?' असा शिवसेनेला डिवचणारा बॅनर लावला होता. हा बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास गायब झाला. हा बॅनर चोरीला गेल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच 'प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!' असा टोलाही भाजपने, शिवसेनेला लगावला आहे.

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) वाद पाहायला मिळत आहे. त्यातूनच उल्हासनगर शहरात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवर सुरू झाला होता. शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनेही (Bjp) '५० कुठे आणि १०५ कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!' असा बॅनर लावला होता.

Kalyan-Dombivali News
Wardha Lok Sabha Seat : काँग्रेसकडे असलेल्या वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही; उमेदवारीसाठीही सरसावले नेते!

असा मजकूर असलेला बॅनर उल्हासनगरच्या १७ सेक्शनच्या चौकात लावला होता. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल अडसूळ यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा बॅनर लावला होता. तसेच रात्री १ वाजता येऊन ते बॅनर लावला असल्याची खातरजमा करून गेले होते. मात्र, आज सकाळी हा बॅनर गायब झाला.

Kalyan-Dombivali News
Nilesh Lanke News : आळंदीत मारहाण झालेल्या भागा महाराजांना महापुजेचा मान मिळावा; नीलेश लंकेंची मागणी !

त्यामुळे मध्यरात्री हा बॅनर कोणीतरी चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच 'उत्तर द्यायचे असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!' असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. हा बॅनर म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना असून शिवसेनेने आम्हाला डिवचल्यास आम्हीही तशाच पद्धतीने यापुढेही प्रत्युत्तर देऊ, असेही कपिल अडसूळ यांनी ठणकावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com