Shiv Sena News : शिवसेना शिंदेंकडे... शिवसेना भवन अन् 'सामना'चे काय होणार? वाचा सविस्तर

Central Election Commission : शिवसेना भवन, पक्षाच्या शाखा आणि मुखपत्र असलेल्या सामना पेपरे काय होणार? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.
Shivsena Bhavan :
Shivsena Bhavan : Sarkarnama
Published on
Updated on

Central Election Commission News : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेनेचा (Shivsena) ताबा शिंदेंकडे गेल्यानंतर शिवसेना भवन, पक्षाच्या शाखा आणि मुखपत्र असलेल्या सामना पेपरे काय होणार? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट न्यायालयात आव्हान देणार आहे. मात्र, सध्या तरी शिंदे गटाकडे हा ताबा आहे. ज्या शिवसेना भवनाला शिवसैनिक मंदिर मानतात, ते शिवसेना भवन कुणाकडे जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेना पक्षाचे हे मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन दादरमध्ये आहे. या सेना भवनावर पक्षाची मालकी नाही, शिवाई ट्रस्टची ही मालमत्ता आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. शिवसेना पक्ष जरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेला असला तरी दादरचे सेना भवन मात्र ठाकरे यांच्या ताब्यात राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Shivsena Bhavan :
By-elections News : ''कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल अमित शाहांनी हेरला;'' म्हणूनच त्यांनी प्रचार...

शिवसैनिकांसह अनेकांचे लक्ष 'सामना' पेपरकडे असते. शिवसेनेचे मुखपत्र मानले जाणारे सामना दैनिक आणि मार्मिक साप्ताहिक याचे काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ही दोन्ही प्रकाशने प्रबोधन प्रकाशन या संस्थेची आहेत. ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. याची मालकी रश्मी ठाकरे यांच्याकडे. त्यामुळे 'सामना' आणि मार्मिकचा ताबा ठाकरे यांच्याकडे असणार आहे.

मात्र, विधिमंडळातील शिवसेना कार्यालयावर शिंदे यांचे राज्य असेल. मंत्रालयासमोरच्या शिवाई कार्यालयावरही शिंदे यांचा ताबा असणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलेले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी बरंच काही गमावले आहे. त्यामुळे आता आगामी काळात त्यांची रणनिती कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, व्हिप कोणाचा चालणार आहे, तर शिंदेंना ठाकरे गटावर व्हिप वापरता येणार नाही, असे कायदे तज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी सांगितले. ते म्हणाले, कारण शिवसेना शिंदे गटाची आणि शिवसेना ठाकरे गटाची हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्यानुसार शिंदेंचा मुख्य पक्ष व ठाकरे गट वेगळा पक्ष आहे. जसा भाजपाचा (BJP) व्हिप शिवसेनेवर चालत नाही, शिवसेनेचा व्हिप राष्ट्रवादीवर चालत नाही, या दोन्ही पक्षांचा व्हिप काँग्रेसवर चालत नाही, तशी स्थिती आहे. कायद्याप्रमाणे हे दोन्ही वेगळे पक्ष असल्याचे मत अणे यांनी व्यक्त केले.

Shivsena Bhavan :
Shivsen News : शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटातील आमदारांना लागू होणार का? कायदेतज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

तसेच शिवसेना पक्षाचा निधी असेल, तर तो निधी शिंदे गटाकडे जाईल, असेही श्रीहरी अणे यांनी सांगितले. पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. ते बँक खाते जर केवळ शिवसेनेचे असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला आहेत. त्यामुळे शिंदे गट अर्ज करून तो निधी आमच्याकडे वर्ग करा, अशी मागणी शिंदे गट करू शकेल. त्या बँक खात्यावर आपले प्रतिनिधी नेमेल, असेही अणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com