Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

Shivsen News : शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटातील आमदारांना लागू होणार का? कायदेतज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

Eknath Shinde News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Published on

Central Election Commission News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsen) पक्ष आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष शिंदे यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील आमदारांना शिंदेंचा व्हिप लागू होणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यावर अनेक ज्येष्ट कायदे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

शिंदेंना ठाकरे गटावर व्हिप वापरता येणार नाही, असे मला वाटते, असे कायदे तज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी सांगितले. ते म्हणाले, कारण शिवसेना शिंदे गटाची आणि शिवसेना ठाकरे गटाची हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, असा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्यानुसार शिंदेंचा मुख्य पक्ष व ठाकरे गट वेगळा पक्ष आहे. जसा भाजपाचा (BJP) व्हिप शिवसेनेवर चालत नाही, शिवसेनेचा व्हिप राष्ट्रवादीवर चालत नाही, या दोन्ही पक्षांचा व्हिप काँग्रेसवर चालत नाही, तशी स्थिती आहे. कायद्याप्रमाणे हे दोन्ही वेगळे पक्ष असल्याचे मत अणे यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shinde Vs Thackeray : शिंदे गट आणखी एक नवा डाव टाकण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या उत्तराकडे असणार महाराष्ट्राचे लक्ष

केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे ते निर्णय देऊ शकतात. न्यायालयाने रोखले असते तर त्यांना निर्णय देता आला नसता. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस, भाजपा आणि इतर अनेक पक्षांचे वाद आले होते. त्या प्रकरणांमध्ये आयोगाने जसे निर्णय दिले त्यापेक्षा हा निर्णय वेगळा दिला आहे. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देणे क्रमप्राप्त आहे, असेही अणे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shiv Sena Vs BJP : ‘शिवसेना, धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा’ : राऊतांच्या दाव्यावर भाजपने दिले हे उत्तर...

तसेच शिवसेना पक्षाचा निधी असेल, तर तो निधी शिंदे गटाकडे जाईल, असेही श्रीहरी अणे यांनी सांगितले. पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. ते बँक खाते जर केवळ शिवसेनेचे असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला आहेत. त्यामुळे शिंदे गट अर्ज करून तो निधी आमच्याकडे वर्ग करा, अशी मागणी शिंदे गट करू शकेल. त्या बँक खात्यावर आपले प्रतिनिधी नेमेल, असेही अणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com