Eknath Shinde On Onion Issue: केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुख्यमंत्री शिंदेंनी मानले मोदी, शाहांचे आभार

Politics On Onion Export: कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar
CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde On Onion Issue : नाफेडने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2410 प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचेही मी आभार मानतो, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आतापर्यंत आपण पाहिलं आहे. अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, तेव्हा सरकारने सर्व नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही.

शिंदे म्हणाले, आता या मोठ्या संकटामध्ये देखील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल, या दृष्टीने चर्चा झाली. काही निर्णय घेतले, त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कांदा चाळी वाढवणं, त्यांचा अनुदान वाढवणं.

तसेच मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून नाशवंत वस्तू जास्तीत जास्त टिकवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतले जात आहेत. 'कांद्याची महाबँक' ही संकल्पना राबवत आहोत.

CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar
#Shorts | अचानक मुख्यमंत्री Eknath शिंदेंची KEM रुग्णालयाला भेट | Politics | Mumbai |Sarkarnama

गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, मी देखील अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारनं दिल्याचंही सांगून आमची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवारांवर निशाणा....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना म्हणाले, पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी 2410 रुपये प्रति क्विंंटल भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय. राज्य सरकार देखील यामध्ये कुठे मागे राहणार नाही. यामध्ये राजकारण न करता, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं.

CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar
Raosaheb Danve : 'शिंदे गट, भाजप आणि अजितदादा गटात कोणताही वाद नाही'| BJP | Sambhajinagar |

शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता. पण, आता मोदी सरकारने मदत केली. त्यामुळे यामध्ये राजकारण करु नये. केंद्र सरकारकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com