Sanjay Raut On Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत आणि इकडे...? राऊतांचा घणाघात

Ratnagiri Refinery News : ...तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील!
Sanjay Raut | CM Eknath Shinde
Sanjay Raut | CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : कोकणातील बारसू रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरु झाले आहे. मात्र, आता स्थानिकांचा जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मंगळवारी सकाळी या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. यावेळी आंदोलनातील महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. आणि जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली होती.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलंय. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याचवेळी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावरुन शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut | CM Eknath Shinde
Sanjay Raut Tweet: संजय राऊत हे राहुल कुल यांचा पिच्छा सोडेनात; फडणवीसांनी दखल न घेतल्याने सीबीआयला पत्र !

संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मंगळवारी (दि.२५) माध्यमांशी संवाद साधला. तसेच टि्वटद्वारेही बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.

टि्वटमध्ये राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत..आणि इकडे कोकणातील बारसु येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटलं आहे. पोलीस दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरडण्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरु असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेपत्ता. हा काय प्रकार आहे? असा संतप्त सवालही राऊतांनी टिे्वटमधून केला आहे.

Sanjay Raut | CM Eknath Shinde
Rajaram Sugar Factory Election Result: सभासदांचा कल कुणाकडे? राजाराम कारखाना निवडणूक निकालात मोठी अपडेट

२४-२४ तास बसवून ठेवत धमक्या...

या राज्याचे उद्योगमंत्री पोलिसांना हाताशी धरून बारसूच्या आंदोलकांना तुमच्यावर गोळ्या झाडू अशा धमक्या देत आहेत. मात्र, स्थानिकांचा जमीन अधिग्रहणाला विरोध आहे. अनेक कुटुंबं परागंदा झाली आहेत.अनेकांना पोलीस स्टेशनला बोलावून २४-२४ तास बसवून ठेऊन धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी राऊतांनी केला आहे.

...तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील!

हे अत्यंत विकृत, दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावरील हजारो लोक मागे हटले नाहीत, तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील. तसेच जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल की काय अशी मला भीती वाटते आहे. आम्ही जनतेबरोबर आहोत. जनतेने विरोध केला आहे. जनता छातीवर गोळ्या झाडायला तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे. अशावेळी शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशाराही खासदार राऊतांनी यावेळी दिला आहे.

Sanjay Raut | CM Eknath Shinde
Ajit Pawar On Ratnagiri Refinery : 'दंडुकेशाही करू नका, सर्वेक्षण स्थगित करा'; अजित पवारांची सरकारला विनंती !

मुख्यमंत्री सुट्टीवर...

संजय राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत म्हणाले, ते स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात. ते हेलिकॉप्टर घेऊन तीन दिवस सुट्टीवर गेलेत. त्यांच्या घराजवळ हेलिपॅड आहे. त्यांनी तेच हेलिकॉप्टर घेऊन बारसूला जावं आणि ७२ तासांपासून बसलेल्या आंदोलकांची अवस्था काय आहे पाहावी. पोलिसांनी कशा बंदुका रोखल्या आहेत, धमक्या देत आहेत हे समजून घ्यावं. देवेंद्र फडणवीसांच्या ह्रदयात थोडी जरी मानवतेची ज्योत असेल तर त्यांनीही जावं आणि काय अवस्था आहे हे पाहावं असंही राऊत यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com