Ajit Pawar On Ratnagiri Refinery : 'दंडुकेशाही करू नका, सर्वेक्षण स्थगित करा'; अजित पवारांची सरकारला विनंती !

Ajit Pawar On Ratnagiri Barsu Refinery : खारघर उष्माघाताची पुनरावृत्ती नको..
Ajit Pawar On Ratnagiri Refinery :
Ajit Pawar On Ratnagiri Refinery : Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar On Ratnagiri Refinery : रत्नागिरीतील रिफायनरी सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन पेटले आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वैभव कोळवणकरांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून तिघानांही रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आले आहे. (movement of Barsu Refinery ignited; 1800 policemen deployed for survey along with CRPF)

Ajit Pawar On Ratnagiri Refinery :
Barsu Refinery Project: बारसू रिफायनरीचं आंदोलन पेटलं! प्रकल्पविरोधी अध्यक्षांना अटक; सर्वेक्षणासाठी CRPF सह 1800 पोलीस तैनात

दरम्यान, रत्नागिरी येथील बारसू - सोलगाव रिफायनरीच्या (Barsu Refinery) दृष्टीने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी सर्व्हेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार यांनी रिफायनरी प्रकल्पासंदर्भात ट्वीट केले आहे. अजित पवार ट्वीट मध्ये म्हणतात, "सर्वेक्षण स्थगित करावं. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं,"

Ajit Pawar On Ratnagiri Refinery :
Uday Samant On Barsu Refinery: रिफायनरी आंदोलनास्थळी पत्रकारांना पोलिसांची अरेरावी; मंत्री सामंत म्हणतात...

"रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.आंदोलक ठाम असून, त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी," असेही अजित पवार म्हणाले आहे.

Ajit Pawar On Ratnagiri Refinery :
Jitendra Awhad On Barsu Refinery: 'बारसूच्या १०० % ग्रामस्थांचा विरोध, आंदोलन हलक्यात घेऊ नका'; आव्हाडांचा सरकारला इशारा..

आंदोलकांवर कारवाई -

आजपासून रिफायनरी प्रकल्प जेथे होणार आहे, त्या बारसू गावच्या जागेचं सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र स्थानिकांना या प्रकल्पाला विरोध केला आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना राजापूरमध्ये अटक करण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वैभव कोळवणकरांसह त्यांच्या दोन सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून तिघानांही रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर, याठिकाणी आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना देखील पोलिसींनी अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com