Political News: वसई बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक कोलासो तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील

Vasai Bazaar Committee : वसई बाजार समितीच्या सभापतीपदाची आणि उपसभापतीपदाची निवड बिनविरोध झाली आहे.
Vasai Bazaar Committee
Vasai Bazaar CommitteeSarkarnama

संदिप पंडीत :

Political News : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर बाजार समित्यांचे निकालही लागले. त्यानंतर आता बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची आणि उपसभापतीपदाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वसई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत यश मिळवले होते. या निवडणुकीत 17 पैकी 16 जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या होत्या.

आज या समितीच्या सभापतीपदाची आणि उपसभापतीपदाची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. अशोक कोलासो यांची सभापतीपदी तर पांडुरंग पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुहास पवार यांनी काम पाहिले.

Vasai Bazaar Committee
Jamkhed News: शिंदे-पवारांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदासाठी रस्सीखेच

सभापतीपदी निवड झाल्यांतर बोलताना अशोक कोलासो म्हणाले, "यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जागेचा प्रश्न न्यायालयात आहे, त्याचा लवकर निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

2 एकर जागा विकत घेऊन मार्केट तयार करण्यावर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी तिन्ही आमदार सहकार्य करणार", असे आश्वासन हितेंद्र ठाकूर यांनी दिले असल्याचे कोलासो यांनी सांगितले.

Vasai Bazaar Committee
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये 'हा' पक्ष सत्तास्थापन करणार?; ताज्या तीन सर्व्हेची आकडेवारी समोर

माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबन शेठ नाईक, माजी महापौर नारायण मानकर, वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नारायण मानकर यांनी सांगितले की, "महापालिकेच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन महामंडळ यांच्या माध्यमातून मार्केट तयार करण्यासाठी नवीन संचालकांनी प्रयत्न करावेत".

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com