Jamkhed News: शिंदे-पवारांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदासाठी रस्सीखेच

Rohit Pawar vs Ram Shinde : अनेकांनी सभापती व उपसभापती पदासाठी फिल्डींग लावली?
Rohit Pawar vs Ram Shinde
Rohit Pawar vs Ram ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर बाजार समित्यांचे निकालही लागले. मात्र, आता बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी कुणाची वर्णी लागणार? यासाठी अनेक ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे. तर अनेकांनी सभापती व उपसभापती पदासाठी फिल्डींगही लावली असल्याची चर्चा आहे.

राज्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar vs Ram Shinde
Karjat Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांना समान जागा; सभापती कुणाचा होणार? सुजय विखेंचं मोठं भाष्य

कर्जत आणि जामखेड या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता पुन्हा एकदा सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी पुन्हा राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कर्जत आणि जामखेड बाजार समितीत दोन्ही गटाला अर्थात राम शिंदे आणि रोहित पवार यांना समसमान जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कुणाचा होणार? यासाठी दोन्ही गटात रस्सीखेच सुरू आहे. तर काहींनी फिल्डींगही लावल्याची चर्चा आहे. जामखेड बाजार समितीच्या सभापती पदाची निवड येत्या 16 मे रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच दोन्ही गटाचे संचालक सहलीला रवाना झाले आहेत.

Rohit Pawar vs Ram Shinde
Parner News: पारनेर बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदी कुणाची वर्णी? लंकेंसमोर मोठा पेच; 'ही' नावे चर्चेत

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटाला सम-समान म्हणजेच प्रत्येकी नऊ-नऊ जागा मिळाल्या. मात्र, सभापती निवडीसाठी बहुमत लागेल. त्यामुळे आता संचालक फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबरोबरच सभापतीपदासाठी गुप्त मतदान प्रक्रिया किंवा हात उंचावून मतांचा कल जाणून घेऊन निवड होऊ शकते. याबरोबरच ईश्वरचिठ्ठीने देखील निवड होऊ शकते.

दरम्यान, जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटात काटे की टक्कर पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा सभापतीच्या निवडीवेळीही दोघांमध्ये पुन्हा काटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून सभापती आणि उपसभापतीपदासाठी काही नावे चर्चेत आहेत. पण सभापतीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.