Art Director Nitin Desai Dies: देवदास, लगान, १९४२ लव्हस्टोरी, हम दिल दे चुके सनम यांसारख्या सुपरडुपर हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांनी पहाटे ३ वाजता आत्महत्या केल्याचे त्यांच्या व्यवस्थापकाने सांगितले. त्यांच्या अशा अकाली एक्झिटने हिंदी आणि मराठी चित्रपट सुष्टीवर शोककळा पसरली आहे.
नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शनासह काही राजकीय रॅली आणि विविध कार्यक्रमांसाठीही सेट उभारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्व राजकीय नेतेमंडळींशीही त्यांचे जवळचे संबंध होते. १९८०च्या दशकात त्यांनी आपल्या कला दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरूवात केली. नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. शेवटच्या वेळी त्यांनी पानिपत या चित्रपटासाठी काम केले होते.
1987 मध्ये 'तमस' या टीव्ही शोमधून नितीन देसाई यांनी करिअरला सुरुवात केली. याकाळात ते तब्बल 13 दिवस आणि 13 रात्री शो'च्या सेटवरच राहिले. या काळात आपण15 मिनिटे जरी अंघोळीला गेलो तरी आपली 15 मिनिटे वाया घालवत असल्यासारखं मला वाटायचं, अशा भावना त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केल्या होत्या. (Marathi News)
दरम्यान, मे महिन्यात एका जाहिरात एजन्सीने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने देसाई यांच्यावर ५१.७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तीन महिने काम करूनही देसाईंनी पैसे दिले न दिल्याचा आरोप एजन्सीने केला होता. पण, नितीन देसाईंनी हे आरोप फेटाळून लावले होते. यापूर्वीही एजन्सीने आपल्यावर असेच आरोप केल्याचा पलटवारही त्यांनी केला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.