Rohit Pawar : "जनता सोबत असली की किल्ला अभेद्य राहतो, निष्ठा जिंकली!"

Rohit Pawar : उत्साह-निष्ठा बळजबरीने आणता येत नाही, स्वयंस्फूर्तीने शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेचा पहिली मेळावा पार पडला. शिंदे गटाचाही पहिला दसरा मेळावा बीकेसीवर झाला. तर उद्धव ठाकरेंनी आपल्या परंपरेनुसार शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका -टिप्पणी झाली. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Dasara Melava)

आमदार रोहित पवार ट्वीट करत म्हणाले, “कालच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते. हेच पुन्हा अधोरेखित झालं.”

Rohit Pawar
Adipurush : महाराष्ट्रात प्रदर्शित होऊच देणार नाही, भाजपची आक्रमक भूमिका!

याचबरोबर आणखी एका ट्वीट मध्ये पवार म्हणाले “मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती, पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो, परंतु सामान्य कार्यकर्ते , जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो. याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली.” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला टोला लगावला.

Rohit Pawar
दोन शाहीर रात्रभर भांडून मनोरंजन करतात, तसे मेळावे झाले, शिंदेंनी भाजपची स्क्रिप्ट वाचली!

दरम्यान आज सकाळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही शिंदेंवर अप्रत्यक्ष भाष्य केले होते. 'काल मी दोघांचेही भाषण ऐकले. सर्व महाराष्ट्राने मेळावे पाहिले. दोघांनीही एकमेकांवर टीका केली, मी दोघांच्याही भाषणावर टीका करणार नाही. पण लोकांनी कुणाच्या पाठीमागे उभे राहायचे हे त्यांनी ठरवायचे. काही लोकांची भाषणं खूपच लांबली, नको तितकी लांबली, असे अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com