Lonand News: चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ लोणंदला कडकडीत बंद

Morcha लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणावरून सकाळी निषेध मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा पुन्हा नगरपंचायतीच्या पटांगणावर आल्यावर तेथे जाहीर निषेध सभा झाली.
Lonand Morcha
Lonand Morchasarkarnama
Published on
Updated on

लोणंद : महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज लोणंद येथे विविध पक्ष व संघटनांनी कडकडीत बंद पाळून शहरातून निषेध मोर्चा काढला.

लोणंद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, माता रमाई महिला मंडळ, वंचित बहुजन आघाडी व आरपीआय, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आदी विविध पक्ष व संघटनांनी लोणंद बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरातील दवाखाने व मेडिकल दुकाने आदी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणावरून सकाळी निषेध मोर्चास प्रारंभ झाला. त्यावेळी मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पुन्हा नगरपंचायतीच्या पटांगणावर आल्यावर तेथे जाहीर निषेध सभा झाली. त्यावेळी डॉ. नितीन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हा उपाध्यक्ष दयानंद खरात, नगराध्‍यक्षा मधुमती गालिंदे, नगरसेवक सागर शेळके, नंदकुमार खरात, अंजुमभाई आतार, दादासाहेब शेळके -पाटील, युवक काँग्रेसचे तारीक बागवान, म्हस्कूअण्णा शेळके, शंकरराव मर्दाने, दत्तात्रय ठोंबरे, अॅड. सुभाषराव घाडगे, चेतना लोखंडे, इम्रान बागवान, शुभम दरेकर आदींनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

Lonand Morcha
Satara : मुठभर लोकांच्या हातात 'रयत'ची सत्ता; प्राध्यापकांवर आंदोलनाची वेळ : उदयनराजे

यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, माजी नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, गणीभाई कच्छी, सीमा खरात, भरत बोडरे, ज्‍येष्ठ नेते एन. डी. क्षीरसागर, आसगर इनामदार, राजूशेठ कुरेशी, सागर गालिंदे, वैभव खरात, सुरेश जावळे, बबलूभाई इनामदार, अरुणशेठ गालिंदे, सुलेमानभाई कच्छी, शफीभाई इनामदार व सर्व स्तरातील महिला व नागरिक उपस्थित होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुनील खरात यांनी आभार मानले. लोणंद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Lonand Morcha
Satara : ३६ हजार सातारकरांनी दिले मोदींना धन्यवाद; सातारा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com